आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराओझर येथील हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या हद्दीतील नाशिक विमानतळाच्या रनवेपासून शंभर मीटर अंतरावरील सुमारे 50 एकर परिसरात आग लागली. येथील वाळलेल्या गवताला शुक्रवारी (ता. 6) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास (एचएएल) सेक्शनमध्ये हि आग लागली.
एचएएलचे तीन अग्निशमन बंब आणि पिंपळगाव बसवंत येथील एक, सिन्नर येथील एक, नाशिक येथील दोन, येवला येथील एक , एअर फोर्स येथील दोन अशा अग्निशमन बंबांच्या आधारे ही आग आटोक्यात आणण्यात आली.
6 नंबर रडार पासून चींधा देवी गेटच्या बाजूने लागली आग
लढाऊ विमानाची निर्मिती एचएएलमध्ये होते. सुखोई या लढाऊ विमानासाठी लागणाऱ्या सहा नंबर रडार पासून चींधा देवी गेटच्या बाजूने ही आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीत किती नुकसान झाले याची माहिती मिळू शकलेली नाही.
दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली
दोन तासांपूर्वी नाशिकच्या एअरफोर्स परिसरात अचानक वणवा पेटला. बघता बघता वणवा हजारो हेक्टरवर पसरला. आगीने रौद्र रुप धारण केले होते. जवळच विमानतळ असल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. आगीचे रौद्र रुप पाहता नाशिकच्या आसपासच्या परिसरातील अग्नीशमन गाड्याही घटनास्थळी रवाना करण्यात आल्या.
अग्नीशमन दलाने दोन तास शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही. तसेच विमानतळाला कोणत्याही प्रकारचा धोका झाला नाही. मात्र हजारो हेक्टरवरील गवत जळून खाक झाले. दरम्यान, ही नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही. अग्नीशमन पथक पुढील तपास करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.