आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्नितांडव:नांदूर मधमेश्वर अभयारण्य परिसरात आग; हजारो पक्ष्यांचा जीव धोक्यात, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट, आगीमुळे पक्षी स्थलांतरित

लासलगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामसरचा दर्जा प्राप्त आणि जलपर्णीने ग्रासलेल्या नांदूर मधमेश्वर येथील पक्षी अभयारण्य परिसरात सोमवारी दुपारी तीन ते सव्वातीन वाजेच्या दरम्यान आग लागली. तिने रौद्ररूप धारण केले आहे. परिसरातील ३०० ते ४०० मीटरपर्यंत ही आग पसरल्याचा अंदाज आहे. यामुळे अभयारण्यातील दहा हजारांवर पक्ष्यांचा जीव धोक्यात आला आहे. याबाबत अभयारण्याच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांनी खासगी क्षेत्रात आग लागल्याची माहिती दिली. मात्र प्रत्यक्षात आग ही पाण्यात असलेल्या गाळपेऱ्याला लागलेली दिसत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. दरम्यान, आगीचे कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट आहे.

अभयारण्याच्या चापडगाव आणि मांजरगावच्या शिवारात ही आग लागली आहे. पक्षीनिरीक्षण केंद्रापासून सुमारे तीन ते साडेतीन किलोमीटर आत ही आग लागलेली असल्याने व मध्ये पाणी असल्याने त्या ठिकाणी संध्याकाळी व रात्रीच्या वेळी जाणे अशक्य असल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले नव्हते. त्यामुळे कर्मचारी मंगळवारी प्रत्यक्षात बोटीने जाऊन पाहणी करणार असल्याचे समजते. दरम्यान, आग वन विभागाच्या हद्दीत नसून ती मालकी हद्दीमध्ये आहे. तसेच ती दलदलीपासून दूर असल्याने माशांना काही धोका नाही. असे वन परिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

आगीमुळे पक्षी स्थलांतरित
सध्या या ठिकाणी ब्राह्मणी बदक, कापसी बदक, धनवड, चांदवा, वारकरी, दलदल ससाणा, रंगीत करकोचा, उघड्या चोचीचा करकोचा, जांभळी पाणकोंबडी अशा विविध प्रकारचे आठ ते दहा हजार पक्षी वास्तव्यास असून पक्षी अन्य ठिकाणी स्थलांतर करण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...