आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फटाकेमुक्त दिवाळी:नाशिकमध्ये फटाके फोडण्यास बंदी, कंटेन्मेंट भागात फटाके फोडल्यास होणार कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आवाहन केले होते

नाशिकमध्ये फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. येत्या 10 नोव्हेंबरच्या रात्रीपासून हा बंदी आदेश लागू होणार आहे. कंटेनमेंट झोन परिसरात फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. राज्यातील कोरोनाचे संकट पाहता जिल्हाधिकारी सुरज मांढरे हे आदेश दिले आहेत.

दोन दिवसांपूर्वीच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन जनतेला केले होते. फटाक्यांमुळे कुणालाही श्वसनाचा त्रास उद्भवणार नाही, याची जबाबदारी आपलीच आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन राज्य सरकारच्यावतीने करण्यात येत असल्याचे टोपे यांनी सांगितले होते.