आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे रोडवरील एका रो-हाऊसला लागलेल्या आगीत तरुणाचा जळून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. 20) सायंकाळी 5 वाजता हॅप्पी होम काॅलनी, राजगुरु रो हाऊस येथे घडली.
अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने परिसरात आग पसरली नाही. जवानांनी आग विझवत असतांना तरुण पुर्णपणे जळून खाक झाल्याचे निदर्शनास आले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट नसल्याने पोलिसांकडून तपास सुरु आहे. मयुर उत्तम कालखैरे (वय 32) असे जळून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलिस आणि अग्निशामक दलाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हॅप्पी होम काॅलनी येथे राजगृह रो हाऊस आहे. सायंकाळी अचानक रो हाऊसमधून धुराचे आणि आगीचे लोळ बाहेर येत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले.
नागरीकांनी तत्काळ अग्निशामक दलास कळवले. काही वेळात अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पर्यत्नाची पराकाष्टा करत रोहाऊसची आगीवर नियंत्रण मिळवले. मयुरचा मृतदेह रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. मृत तरुणाच्या पश्चात आई भाऊ असा परिवार आहे.
अग्निशामक दलाचे इकबाल शेख, शिवाजी फुगट, दिनेशे लासुरे, भिमाशंकर खोडे, वाहन चालक अभिजित देशमुख यांनी ही कारवाई केली. मुंबईनाका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
आगीचे कारण गुलदस्त्यात
रो हाऊसला आग लागून तरुणाचा मृत्यू झाला. प्रथमदर्शनी ही आग शाॅर्ट सर्किटने लागल्याची शक्यता वर्तावली जात आहे. घरात तरुण झोपलेला होता. मात्र त्याला आग लागली हे कळले नाही. त्याचा झोपेतच जळून मृत्यू झाल्याने पोलिसांकडून या प्रकरणाचा शोध घेतला जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.