आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सायक्लोथॉन द्वारे तंदुरुस्तीचा संदेश; ओपन स्ट्रीटचाही लुटला आनंद, बालकांचाही सहभाग

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाच्या स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज आणि सायकल फॉर चेंज अंतर्गत स्मार्ट सिटी काॅर्पाेरेशनच्या वतीने रविवारी (दि. ४) सायक्लोथॉन आणि ओपन स्ट्रीट कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात माेठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नाेंदवत आनंद लुटला. लहान व माेठ्या गटात स्पर्धा झाली. यात बालगाेपालही सहभागी झाले. यातून तंदुुरुस्त आराेग्याचा संदेश देण्यात आला.राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आैचित्य साधून पहिल्या टप्प्यात सायक्लोथॉन रॅली सकाळी ६ वाजता वाजता गोदा पार्क येथून सुरू झाली. त्यानंतर रॅली रामवाडी-घारपुरे घाट- अशोकस्तंभ-मॅरेथॉन चौक- गंगापूर नाका-जेहान सर्कल-पाइपलाइन सिग्नल-सोमेश्वर मंदिर-बारदान फाटा-नवश्या गणपती व परत मॅरेथॉन चौक येथे समाराेप करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात ओपन स्ट्रीट इव्हेन्ट हा अभिनव उपक्रम मॅरेथॉन चौक ते केकाण हॉस्पिटल या स्मार्ट सिटीमार्फत पुनर्विकास झालेल्या स्मार्ट रस्त्यावर आयोजित करण्यात आला. १०० मीटर मॅरेथॉन, ३०० मीटर मॅरेथॉन, हॉपस्कॉच, तीनपायांची शर्यत, सॅक रेस स्पर्धा घेण्यात आली. विशेष म्हणजे स्पर्धा फक्त मुलांसाठी नसून ती त्यांच्या पालकांसाठी देखील घेण्यात आली. अ‍ॅड. दत्तात्रेय चकोर यांनी सायकल आणि पर्यावरणाचे संरक्षण व जतन याबाबत मार्गदर्शन केले. नाशिक शहरातील हवामान बदलावर एनआयए फेलोद्वारे कार्यशाळा घेण्यात आली. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी मार्गदर्शन केले. महाव्यवस्थापक स्थापत्य दिग्विजय पाटील, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर माने,स्मार्ट सिटी इंटर्न, शालेय विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...