आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक प्रक्रिया:आयएमए अध्यक्षपदासाठी‎ पाच डाॅक्टर्स समाेरासमाेर‎

नाशिक‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयएमए नाशिक शाखेच्या‎ अध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या पाच‎ अर्जांपैकी एकही उमेदवाराने माघार घेतली‎ नसल्याने आता पाच डॉक्टर‎ अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिगणात‎ आहेत. शनिवारी (दि. ११) अंतिम यादी‎ जाहीर करण्यात आली.‎ आयएमए नाशिक शाखेच्या‎ अध्यक्षपदासह कार्यकारी मंडळाच्या‎ निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून १५‎ तारखेला दुपारी बारा ते सायंकाळी पाच‎ वाजेपर्यंत शालिमार येथील आयएमए‎ कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडणार‎ आहे.

मतदान होणार आहे. अध्यक्षपदासाठी‎ डॉ. सुचेता बच्छाव, डॉ. कविता गाडेकर,‎ डॉ. विशाल पवार, डॉ. सुधीर संकलेचा, डॉ.‎ शिंदे निवडणूक रिंगणात आहेत. अर्ज‎ माघारीला एकाही इच्छुकाने अर्ज मागे न‎ घेतल्याने अाता चुरस बघायला मिळणार‎ अाहे. विद्यमान अध्यक्ष डॉ. राजश्री पाटील‎ यांचा कार्यकाळ १५ मार्च रोजी संपत‎ असल्याने निवडणूक घेतली जात आहे.‎ दरम्यान, आयएमए कार्यकारी मंडळाच्या‎ १८ जागांसाठी केवळ १७ अर्ज आल्याने‎ कार्यकारी मंडळाची निवडणूक बिनविरोध‎ झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी‎ म्हणून डॉ. मंगेश थेटे, डॉ. महेश मालू, डॉ.‎ श्रद्धा वाळवेकर हे काम पहात आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...