आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामित्र असलेल्या पाच ज्येष्ठांनी पर्यावरण संवर्धनाचा छंद जोपासत आपल आयुष्य आनंदी केले आहे. मागील १० वर्षांपासून विविध प्रकारचे वृक्ष लावत त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा आगळा छंद त्यांनी जोपासला असून यातून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे.
नवीन नाशिकमधील ज्येष्ठ नागरिक सावळीराम तिदमे, प्रकाश काळे, अशोक कुलकर्णी, अरुण महाले, पंडितराव गिते या ज्येष्ठ नागरिक मित्रांनी झाड लावायचे, ते जगवायचे व दरवर्षी त्या झाडाचा वाढदिवस साजरा करायचा. अशा पद्धतीने या सर्व मित्रांनी वड, पिंपळ, जांभूळ, आंबा, कडुलिंब अशी झाडं लावली. प्रत्येकाने दिवस ठरवून घेत रोज पाणी घालणे, हा उपक्रम सातत्याने सुरू राहिला. तब्बल १० वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. याची सुरुवात शिवाजी चौकातील मैदानातून झाली. जे मैदान कचराकुंडी झाले होते. ते मैदान आता हरित झाले आहे.
ही झाडे म्हणजे जणू परमेश्वरी शक्ती आहेत. त्यांच्यामुळे आपल्याला प्राणवायू मिळतो. त्यामुळेच ऊन वारा पाऊस याचे नियंत्रण होते. त्या सर्व वृक्षांची सेवा करताना हे ज्येष्ठ नागरिक अभंग, हरिपाठ, भजन, आरती करतात. यातील अनेक झाडांना १० वर्षे पूर्ण झाली आहेत.
परमेश्वर शक्तीची अनुभूती
आम्ही १० वर्षांपासून ही झाडे लावली व जगवली. आम्ही या झाडांचा वाढदिवस साजरा करतो. यामुळे परमेश्वर शक्तीचा अनुभव येतो. - सावळीराम तिदमे, ज्येष्ठ नागरिक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.