आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​अनास्थेचेचे टेकऑफ:5 वर्षांपूर्वी 4 मार्गांसाठी मंजूर ‘उडाण’ अद्यापही जमिनीवरच ; सेवेचा पाठपुरावाच नाही

नाशिक / संजय भडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उडान याेजनेतून नाशिकसाठी २०१७ साली मंजुर झालेल्या हिंडन-नाशिक, बंगलाेर-नाशिक, भाेपाळ-नाशिक आणि नाशिक गाेवा या चार मार्गांवरील विमानसेवेचे उडाण अद्यापही जमिनीवरच आहे. या चार मार्गांवर विमानसेवा का सुरू झाली नाही. त्याचा पाठपुरावा लाेकप्रतिनिधींनी का केला नाही? असा सवाल आता नाशिककर उपस्थित करत आहेत.

टायर टू शहरांमध्येही विमानसेवा सुरू व्हावी या हेतूने पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ‘उडे देश का आम नागरिक’ याेजना अर्थात रिजनल कनेक्टिव्हिटी स्किम (उडाण) अमलात आणली. त्यातून या चार मार्गांवर विमानसेवा देण्यात आली हाेती. आता अलायन्स एअरने या याेजनेची मुदत संपल्याने पुणे, बेळगाव, अहमदाबाद, दिल्ली या मार्गावरील सेवा बंद केल्यानंतर २०१७पासून सुरू न झालेल्या या चार मार्गांचे हे वास्तव समाेर आले आहे.

‘दिव्य मराठी’ने फाेडली वाचा; लाेकप्रतिनिधींना आली जाग अलायन्स एअरची विमानसेवा बंद झाल्यानंतर नाशिककरांमध्ये असलेली संतप्त भावना त्यांच्याच भाषेत ‘दिव्य मराठी’ने मांडल्यानंतर लाेकप्रतिनिधींना जाग आल्याचे चित्र शुक्रवारी पहायला मिळाले. नाशिकमधील रखडलेल्या विविध प्रकल्पांसंदर्भात खासदार हेमंत गाेडसे यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांसाेबत मंत्रालयात बैठक झाली. दुसरीकडे केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांनी पत्रकार परिषद घेत उडान याेजना संपूर्ण देशातच संपल्याचा दावा केला. उडान याेजनेची जानेवारीतच मुदत संपूनही कंपनीने सेवा सुरू ठेवली हाेती. प्रतिसाद कमी मिळत हाेता असे कंपनीचे म्हणणे हाेते. केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्याेतिरादित्य सिंधिया यांच्याकडे पाठपुरावा केला असून, व्यावसायिक कारणांसाठी ही सेवा अलायन्स एअरने खंडित केल्याचे त्यांचे उत्तर आले आहे. उडान याेजनेतून पुन्हा या सेवा सुरू हाेण्याकरिताचा प्रस्ताव मंत्रालयाकडे प्रस्तावित असल्याचे स्पष्टीकरणही डाॅ. पवार यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...