आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानसेवा:नाशिकमधून उद्यापासून नाॅर्थ गाेवा,‎ नागपूर, अहमदाबादसाठी विमानसेवा‎

नाशिक‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिककरांसाठी बुधवार (दि.‎ १५)पासून नाॅर्थ गाेवा, नागपूर‎ आणि अहमदाबाद या तीन‎ शहरांकरिता इंडिगाेकडून‎ विमानसेवा सुरू हाेत आहे. ज्याचे‎ तिकीट बुकिंग कंपनीने मागील‎ महिन्यातच सुरू केले आहे.‎ महत्त्वाची बाब म्हणजे, एकीकडे‎ इंडिगाे नाशिकमध्ये पदार्पण करत‎ असतानाच स्पाइस जेट मात्र‎ हैदराबादसाठीचे तिकीट बुकिंग २६‎ मार्चपासून बंद करत आहे. त्यांची‎ दिल्ली सेवा नियमित सुरू असणार‎ आहे.

हैदराबाद सेवा अनिश्चिततेच्या हिंदाेळ्यावर‎
काही कारणास्तव स्पाइस जेटने २६‎ मार्चपासून हैदराबादकरिताचे तिकीट‎ बुकिंग बंद केले आहे. ताेपर्यत जर‎ कंपनीने ही सेवा पूर्ववत केली नाही तर‎ मग मात्र किमान महिनाभर ही सेवा बंद‎ राहण्याची शक्यता असल्याचे‎ निमाच्या एव्हिएशन कमिटीचे‎ चेअरमन मनीष रावल यांनी सांगितले‎.

बातम्या आणखी आहेत...