आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंचवटी, म्हसरूळ व आडगाव या उपनगरांमध्ये आज रात्री मुसळधार पाऊस झाला. या भागातून वाहणाऱ्या गोदावरीची उपनदी वाघाडी (वरूणा) पूरस्थिती निर्माण झाली. येथील नारोशंकर मंदिराच्या शेजारी नदीपात्रात असलेल्या गोपालदास समाधी मंदिराला लागून एक रिक्षा पाण्यात अडकून पडली, तर दुसरी रिक्षा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. पुरात सापडलेल्या एका रिक्षामध्ये प्रवासी होते. अचानक पाणी वाढल्याने त्यांनी रिक्षेतून बाहेर उड्या मारल्या. स्थानिकांनी आणि जीवरक्षक दलांच्या जवानांनी त्यांना वाचवल्याने दुर्घटना टळली. पुराचे पाणी गाडगे महाराज पुलाखाली वेगाने आले.
वाघडमध्ये जीवरक्षक दाखल
नदीपात्रात उभ्या असलेल्या दोन रिक्षा एक कार, दुचाकी पाण्यात वाहून गेल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. रात्री सात वाजेनंतर वाघाडमध्ये पाण्याची पातळी वाढून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. पोलिस आणि जीवरक्षक मोठ्या संख्येने परिसरात दाखल झाले होते.
रविवारी सकाळपासूनच कडक ऊन पडलेले असताना अचानक दुपारी १ वाजेच्या सुमारास ढग जमा होवून जोरदार पाऊसाला सुरूवात झाली. अर्धा-पाऊण तासाच्या पाऊसानंतर पुन्हा उघडीप देत ऊन पडले. आकाश स्वच्छ व काळे ढग निघून गेले असताना नागरिकांना विशेष करून व्यापाऱ्यांना हायसे वाटले. रविवारची सुट्टी असल्याने व राखी पोणिर्माच्या सणा निमीत्त खरेदीसाठी मोठ्या संख्येने कुटुंबीय बाहेर पडले होते. त्याचवेळी सायंकाळी ६ .३० वाजेनंतर पुन्हा पाऊस सुरू झाल्याने कुटूंबियांची चांगलीच पळापळ झाली.
त्यातच कॉलेजरोड, गंगापूररोड, विद्या विकास सर्कल, त्रिमुर्ती चाैक, पववनगर आणि शालीमार, मेनरोड भागात दुकानांसमोरच राख्या विक्रीचे दुकाने सुरू केलेल्यांची धावपळ होवून काही प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागले. मात्र, या पावसाने खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांचा हिरमोड झाला. त्र्यंबकरोडवर सावरकर जलतरण तलावासमोर आणि वेदमंदिर, चांडक सर्कल,मायको सर्कलच्या सकल भागात पाणी सचाले होते
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.