आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षा अडकल्या:वाघाडीला पूर; रिक्षेतील प्रवाशांनी पाण्यात उड्या मारल्याने जीव वाचला

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाेदावरीची उपनदी वाघाडी (वरुणा) नदीला रविवारी (दि. ७) सायंकाळी सातनंतर अचानक पूर आल्याने या पुरात दाेन रिक्षा अडकल्या. प्रवाशांनी पाण्यात उड्या मारत आपला जीव वाचवला. दरम्यान, या पूरामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शहरात पावसाचा जाेर रविवारी कमी असला तरी पंचवटी, म्हसरूळ व आडगाव या उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस झाला. या भागातून वाहणाऱ्या वाघाडीला पूर आला. येथील रामसेतूजवळ नदीपात्रात असलेल्या गोपालदास समाधी मंदिराला लागून उभी असलेली एक रिक्षा वेगाने येणाऱ्या पाण्यात अडकली. तर दुसरी रिक्षा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली.

पुरात सापडलेल्या एका रिक्षामध्ये प्रवासी होते. अचानक पाणी वाढल्याने त्यांनी रिक्षेतून बाहेर उड्या मारल्या. स्थानिकांनी आणि जीवरक्षक दलाच्या जवानांनी त्यांना वाचवल्याने दुर्घटना टळली. पुराचे पाणी गाडगेमहाराज पुलाखाली वेगाने आले. नदीपात्रात उभ्या असलेल्या दोन रिक्षा एक कार, दुचाकी पाण्यात वाहून गेल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. पाेलिस आणि जीवरक्षक माेठ्या संख्येने परिसरात दाखल झाले हाेेते.

शहरात ६८ दिवसात ७४८ मिमी पाऊस
राज्यात पावसाला अनुकूल वातावरण तयार झाल्याने रविवारी दुपारी अचानक जोरदार पाऊस झाला. दुपारनंतर पावसाचा जाेर हाेता. शहरात ६८ दिवसात ७४८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरात २ दिवस पावसाने विश्रांती दिल्यानंतर रविवारी दुपारी पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. तर अर्ध्या तासानंतर परत आकाश निरभ्र झाल्याने उन्हाची तिव्रता वाढली होती. ऊन-पावसाच्या या खेळामुळे उकाड्याने मात्र नागरिक हैराण झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...