आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या दोन ते तीन वर्षांत उत्पन्न घटले तर दुसरीकडे आहे त्या उत्पन्नाच्या दीडपट खर्च करण्याऐवजी त्यापेक्षाही अधिक रकमेची कामे मंजूर झाली. सद्यस्थितीत २८०० कोटींचे दायित्व असून हेच दायित्व जमा होणाऱ्या एक हजार कोटींच्या आसपास असलेल्या उत्पन्नाच्या अनुषंगाने १५०० कोटींपर्यंत असणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेत किमान १३०० कोटींचे दायित्व कमी करण्यासाठी आर्थिक शिस्तीला सुरुवात केल्याचे सांगत आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी मायको सर्कल उड्डाणपूल, गोदावरीवरील अनावश्यक पुलांसह अन्य जवळपास पाचशे कोटींच्या कामांवर फुली मारली जाईल, असेही स्पष्ट केले.
लोकप्रतिनिधींची राजवट नसल्यामुळे नवीन विकासकामांची मागणी कमी आहे. निवडणूक जर ऑक्टोबर महिन्यात झाल्या तर हातात सुधारणेसाठी सहा महिने मिळू शकतील. या काळात अनावश्यक कामे रद्द करून आर्थिक बचत केली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक खातेप्रमुखाला अनावश्यक कामे कोणती हे शोधण्यास सांगितले आहे. अनेक कामे चार ते पाच वर्षांपासून प्रशासकीय मान्यतेमुळे दायित्वाच्या खर्चात गृहित धरली जात आहे. प्रत्यक्षात ही कामे सुरूच झालेली नाही. ही बाब लक्षात घेत अशा जवळपास दोनशे कोटी रुपयांच्या कामावर फुली मारली आहे. मायको सर्कल उड्डाणपूल व अन्य काही कामे रद्द करून जवळपास पाचशे कोटींचा भार कमी करण्याचा प्रयत्न आहे. सातपूर भागातील काही मळे परिसरात गरज नसताना रस्त्यांची कामे धरली होती. ही कामे रद्द न करता जेथे गरज आहे तेथे सुरू करण्याचा निर्णय घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.