आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाडाझडती:कामांचा वेग पाळा, अडचणी टाळा; पालकमंत्री भुजबळ यांचे आदेश, स्मार्ट सिटीच्या कामांची केली पाहणी

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेळ सकाळी ९.३० वाजता... पालकमंत्री छगन भुजबळ...पालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार.. स्मार्ट सिटीचे सीईओ सुमंत मोरे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रचंड मोठा ताफा वळाला तो स्मार्ट सिटीच्या वतीने शहरात सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी. शालीमार परिसरातील महात्मा फुले कलादालनापासून या पाहणी दौऱ्याला सुरुवात होवून तब्बल दोन तासानंतर थेट दहीपूल येथे संपविण्यात आला. शहराचा विकास, सौंदर्यीकरणासाठी कामे महत्त्वपूर्ण आहेत मात्र नागरिकांना अडचणी ठरु नये यासाठी कामे वेगाने पूर्ण करणे गरजेचे आहे. मात्र रामकुंडात स्वच्छ पाणी आल्याशिवाय शहर स्मार्ट सिटी होणार नाही. यासाठी शहरातील सांडपाणी प्रक्रिया न करताच गोदावरी सोडू नये,असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळांनी स्मार्ट सिटीला दिले.

नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या वतीने शहरात विविध कामे केली जात आहे. या कामाबाबत विविध संघटनासह नागरिकांकडूनही तक्रारी केल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. ३) पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्मार्ट सिटीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पाहणी दौरा केला. या दौऱ्यात पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार, स्मार्ट सिटीचे सीईओ सुंमत मोरे, शहर अभियंता उदय वंजारी, पालिका उपायुक्त मनौज घोडे पाटील, प्रकल्प संचालक दिग्विजय पाटील, किसन कानडे नगससेवक गजानन शेलार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे आदींसह पालिका व स्मार्ट सिटीचे अधिकारी उपस्थित होते.

सकाळी ९.३० वाजता शालिमार परिसरातील महात्मा फुले कलादालन येथून या दौऱ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर नेहरु गार्डन, रामवाडी पूल परिसरात सुरु असलेला पोजेक्ट गोदा, पंचवटी मोटार डेपो येथील पाण्याची टाकली, इंद्रकुंड परिसरातील पलुस्कर सभागृह, रामकुंड-गोदाघाट परिसर, रामसेतू, दहिपूल परिसर आदी ठिकाणी पाहणी करत त्या ठिकाणी असलेल्या कामाचा आढावा घेतला.गोदाकाठी कोट्यवधी रुपयांची कामे केली जात आहे. मात्र त्याआधी त्यात मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्या, तसेच रामसेतू पाडण्याऐवजी त्याचे मजबुतीकरण बरोबरच सौंदर्यीकरण करा असेही यावेळी भुजबळांनी सुचना दिल्या. नेहरु चौक परिसरातील केलेल्या रस्त्यांच्या कामामुळे व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले असून स्थानिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे यावेळी परिसरातील नागरिकांनी भुजबळांचे याकडे लक्ष वेधले. दुकानदारांच्या अडचणी सुटतील या दृष्टीने रेलिंग काढून त्या ठिकाणी पायऱ्या करण्याबाबत सूचना यावेळी भुजबळांनी दिल्या.

बातम्या आणखी आहेत...