आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावडाळा चौफुली ते साईनाथनगर सिग्नल अन् तेथून कलानगर चौफुली या रस्त्यावर रोज रात्री ७ वाजेपासून ते रात्री १२ वाजेपर्यंतच्या कालावधीत आईस्क्रीम विक्रेत्यांसह इतर खाद्यपदार्थांच्या हातगाड्या उभ्या असतात. ते खाद्यपदार्थ घेण्यासाठी या ठिकाणी वाहनांच्या रांगाच भररस्त्यात उभ्या रहात असल्याने निम्म्याहून जास्त रस्ता त्या व्यापतात आणि वाहतूककोंडीहोते. त्यातच रथचक्र चौकात तर भाजी विक्रेते फार डोकेदुखी ठरत आहेत.
पालिकेच्या अतिक्रमण विभागाने दोन दिवसापूर्वीच सूचना देऊनही किंवा कारवाईचा इशारा देऊनही वाहतुकीस अडथळे ठरणारे विक्रेते अतिक्रमणच करीत आहेत. या भागात रोजच लहान-मोठे अपघातहोत आहेत. रात्री नियमितपणे लगतच्या रस्त्यावर खाद्यपदार्थ, आईस्क्रीम विक्रेत्यांची रांगच असते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.