आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परवड:कौटुंबिक निवृत्तिवेतनासाठी; 5 वर्षांपासून दिव्यांगांची परवड

नाशिक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारच्या कौटुंबिक निवृत्तिवेतनाचा लाभ मिळावा यासाठी शिंगवे बहुला, देवळाली कॅम्प परिसरातील एका व्यक्तीला पाच वर्षांपासून भटकूनही न्याय मिळालेला नाही. थेट उच्च न्यायालयापर्यंत दाद मागूनही अद्याप दिलासा मिळालेला नाही. त्याचा हा संघर्ष केंद्र सरकारची कौटुंबिक निवृत्तिवेतन याेजना आणि ती राबविणारी यंत्रणा यावर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे.

प्रवीण उघडे या ४२ वर्षीय दोन्ही पायाने अपंग असलेल्या व्यक्तीची व्यथा आहे. त्यांचे आई-वडील दोघेही या जगात नाहीत, त्यांना तीन मुले असून कुठलेही अर्थसहाय्य नाही, म्हणून या व्यक्तीने केंद्र सरकारच्या कौटुंबिक निवृत्तिवेतन योजनेचा लाभ मिळावा याकरिता ऑगस्ट २०१७ मध्ये नाशिकरोडच्या करन्सी नोट प्रेसच्या संबंधित अधिकाऱ्यांना सादर केला, हा अर्ज ऑक्टोबर २०१८ मध्ये नामंजूर करण्यात आला.

भारत सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनर्स वेल्फेअर विभागानुसार मुख्य महाव्यवस्थापक, करन्सी नोट प्रेस यांना असे कौटुंबिक निवृत्तिवेतन मंजूर करण्याचा विशेष अधिकार असतानाही आपला अर्ज नामंजूर करण्यात आल्याचे प्रवीण उघडे यांचे म्हणणे आहे. यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात पब्लिक ग्रीव्हीएन्स सेलकडे याबाबत तक्रार केली असता, त्यांचा अर्ज विचारात घेऊन योग्य मार्गाचा अवलंब करून योग्य फोरममार्फत तजवीज करू शकता असे उत्तर दिले आहे. त्यामुळे उघडे यांचा प्रश्न कायम असल्याचे व अशाप्रकारचा जाच कितीतरी लोक सहन करत असतील. त्यांच्यावरील अन्याय दूर होऊन प्रचलित कायद्यातील आपले कौटुंबिक निवृत्तिवेतन मंजूर करण्यात यावे, अशी विनंती उघडे यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...