आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑक्सिजन गोदा शुद्धीकरणासाठी:कोविड सेंटरच्या प्रकल्पातील  ऑक्सिजन गोदा शुद्धीकरणासाठी

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोट्यवधी रुपये खर्च करून कोविड केअर सेंटरमध्ये उभारलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाचा सध्या कोणताही उपयोग होणार नसल्याचे लक्षात घेत आयुक्त कैलास जाधव यांनी येथील ऑक्सिजनचा वापर करून गोदावरीसह उपनद्यांचे पाणी कसे शुद्ध करता येईल यादृष्टीने नियोजन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून, ऑक्सिजन प्लांटच्या माध्यमातून या सांडपाण्यावर ‘ऑक्सिनायझेशन’ची प्रक्रिया केली जाणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन तुटवड्यामुळे हाहाकार उडाला होता. ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्यामुळे पालिकेने स्वत:च रुग्णालये तसेच खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन निर्मितीसाठी पीएसए प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला. महापालिकेने सीएसआर तसेच स्वखर्चातून २२ पीएसए प्लांट उभारले. मात्र तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची फारशी गरज पडली नाही. त्यामुळे आता या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे करायचे काय असा प्रश्न आहे. अशातच हरित लवादाने गोदावरी नदीतील पाणी आंघोळीसाठी अयोग्य असल्याचे फटकारल्यानंतर या प्रकल्पातील ऑक्सिजनचा वापर करून गोदापात्रात येणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण करता येईल का याची चाचपणी आयुक्तांनी सुरू केली आहे.

नागपूरच्या संस्थेची मदत; बीओडी दहाखाली आणण्याची धडपड रामकुंड व तपोवनात मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्यामुळे किमान त्यांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी नागपूर येथील ओझोन रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅप्लिकेशन प्रा. लि. या कंपनीच्या मदतीने दोन ओझोनायझेशन प्लांट उभारण्याची तयारी केली आहे. शहरातून जाणाऱ्या गोदावरी नदीच्या १९ किलोमीटर लांबीच्या पात्रात २२ पीएसए प्लांटच्या मदतीने ऑक्सिजनची प्रक्रिया केली जाणार आहे. त्यात बीओडी अर्थात पाण्यातील ऑक्सिजन पातळी वाढवून पाणी शुद्धीकरण केले जाणार आहे. पाण्याचा बीओडी (बायोमेडिकल ऑक्सिजन डिमांड) १० च्या आत आल्यास गोदावरीचे प्रदूषण कमी होऊ शकेल.

कोविड सेंटरच्या प्रकल्पातील ऑक्सिजन गोदा शुद्धीकरणासाठी नाशिक

बातम्या आणखी आहेत...