आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपनीकडून वितरकांची अडवणूक:ब्रॅण्डेड पेट्राेलची सक्ती, सामान्यांना आर्थिक झळ; पंपांवर ग्राहकांचे वाद

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेल कंपन्यांकडून पंप चालक, वितरकांना ब्रॅण्डेड पेट्राेल खरेदीची सक्ती केली जात असून यासाठी काेटा मान्य केला तरच अपेक्षीत पेट्राेल-डिझेल मिळत आहे. यामुळे मात्र पंपचालकांना ब्रॅण्डेड पेट्राेल खरेदी करून त्याची विक्री करावी लागत असून हे पेट्राेल लिटरमागे ६ रुपयांनी महाग असल्याने ग्राहकांना नाहक आर्थिक भुर्दंड बसताे आहे. यातूनच महागडे पेट्राेल भरले म्हणून पंपावरील कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये वादाच्या घटनाही घडत आहेत.

भारत पेट्राेलियम कंपनीचे स्पीड पेट्राेल, इंडियन ऑइलचे एक्स्ट्रा प्रिमियम पेट्राेल तर हिंदुस्थान पेट्राेलियमचे पाॅवर पेट्राेल या नावाने ब्रॅण्डेड पेट्राेलची विक्री हाेत असते. हे पेट्राेल शुध्द असल्याने त्याला एक स्वतंत्र ग्राहकही आहे. मात्र, या पेट्राेलमध्ये जास्त कंपन्यांना मिळत असल्यानेच वितरकांना विशिष्ट काेटा खरेदी केला तरच साधे पेट्राेल-डिझेल मागणीनुसार काही प्रमुख कंपन्यांकडून दिले जात आहे.

सर्वाधिक इंधन विक्रीचे पंप टार्गेट : शहरात ८० पंप असून यापैकी सर्वाधिक विक्री असलेले प्रमुख पंप इंडियन ऑइल कंपनीचे आहेत. या कंपनीकडूनही काेटा दिला जाताे ताे उचलला तरच अपेक्षीत पेट्राेल-डिझेल पुरविले जाते, असे नाव न छापण्याच्या बाेलीवर एका वितरकाने सांगितले. यानंतर भारत पेट्राेलियम व हिंदुस्थान पेट्राेलियमचा क्रमांक यात लागताे.

बातम्या आणखी आहेत...