आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामगरपलिका:पावसाळ्यापूर्वीची कामे करण्यास पालिकेला विसर, तक्रार दुर्लक्षित ; नागरिकांकडून नाराजी

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्याच्या तोंडावर पालिकेच्या वतीने दरवर्षी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येते. यंदा मात्र या मोहिमेचा पालिकेला विसर पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पखालरोड परिसरात नासर्डी नदीचे पाणी तुंबून इमारतीत शिरत असते. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.याबाबत तक्रारी करूनही पालिकेच्या वतीने यंदा कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना न करण्यात आल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. पखालरोड परिसरात असलेल्या नासर्डी नदी पावसाळ्यात तुंडूब भरुन वाहत असते.नदीचे पाणी थेट परिसरातील इमारतीमध्ये घुसत असल्याने रहिवासींना माेठ्या अडचणीचा सामना करावा लागतो.याच पार्श्वभुमीवर पालिकेच्या वतीने नासर्डी नदी व परिसरात स्वच्छता माेहीम राबवली जाते. मात्र यंदा पालिकेच्या वतीने नदी परिसरात कोणत्याही प्रकारची स्वच्छता करण्यात आलेली आहे. अथवा पावसाळ्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे या परिसरातील स्वच्छतेबाबत पालिकेच्या स्मार्ट नाशिक या अॅपवर तक्रारी करुनही अधिकाऱ्यांकडून याकडे साेईस्कर दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत तक्रारी वाढतच आहे.

स्मार्ट अॅपवरील तक्रारीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या शहरात नागरिकांच्या सोईच्या दृष्टीने स्मार्ट नाशिक हे अॅप साकारण्यात आलेले आहे. या अॅपवर नागरिकांना आपल्या तक्रारी नोंदविता येतात. मात्र नागरिकांनी नोंदविलेल्या तक्रारी साेडविल्याच जात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. स्मार्ट अॅपवरील तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...