आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:एकाच घरातील माजी नगरसेवक वडील शिंदे सेनेत तर नगरसेवक मुलगी भाजपत

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्या माजी नगरसेविका कोमल मेहरोलिया स्वपक्षातच राहणार आहेत. मात्र त्यांचे वडील तथा माजी नगरसेवक प्रताप मेहरोलिया यांनी मात्र उद्धव ठाकरे सेनेच्या दोन माजी नगरसेवकांसोबत भविष्यातील पालिका निवडणुकीची समीकरणे लक्षात घेत शिंदे गटात उडी घेतली आहे. त्यामुळे वडील शिंदे गटात तर मुलगी भाजप असे चित्र आहे.

शुक्रवारी (दि. १६) मध्यरात्री उद्धव सेनेतील ११ नगरसेवकांनी मुंबई गाठून मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. एकीकडे उद्धव गटाला धक्का बसला असताना दुसरीकडे शिंदे गटाने मात्र भाजपलाही सुरुंग लावला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या खासगीतील माहितीनुसार, शिंदे गटाने इनकमिंग करताना भाजपला धक्का लावू नये असे ठरले होते.

बातम्या आणखी आहेत...