आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अपघात:माजी क्रिकेटपटू शेखर दळवी यांचा मृत्यू, सेल्फी काढताना 250 फूट दरीत कोसळले

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दळवी हे ट्रेकिंगसाठी इगतपुरी तालुक्यामध्ये आलेले होते.

माजी रणजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक शेखर दळवी यांचा मृत्यू झाला आहे. सेल्फी घेताना खोल दरीत कोसळून त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही घडना घडली.

दळवी हे दरीत कोसळल्यानंतर तात्काळ बचाव पथकाला माहिती देण्यात आली. मंगळवारी (1 सप्टेंबर) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे अंधार पडल्याने तेव्हा शोधकार्य होऊ शकले नाही. मात्र बुधवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. अखेर त्यांचा मृतदेहच बचाव पथकाला सापडला आहे.

दळवी हे ट्रेकिंगसाठी इगतपुरी तालुक्यामध्ये आलेले होते. त्यांचे काही मित्रही यावेळी बरोबर होते. मानस हॉटेलच्या परिसरात ते आले असता भीमा 2 या रेल्वे पुला समोरील टेकडी वरून एका खोल दरीच्या ठिकाणी ते सेल्फी काढत असताना हा अपघात झाला. त्याचवेळी त्यांचा तोल गेल्याने ते 250 फूट खोल दरीत कोसळले. याठिकाणी असलेल्या डोहात ते पडले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.