आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:माजी राज्यपाल राम नाईक यांना पुरस्कार

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या महाराष्ट्र कौन्सिल ऑफ एज्युकेशनल अॅडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंट (पुणे) यांच्या वतीने उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांना नामदार गोपाळ कृष्ण गोखले पुरस्कार प्रदान करण्यात आला. गोखले एज्युकेशन सोसायटीतर्फे दरवर्षी शिक्षण, समाज, संशोधन, विज्ञान क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या महान व्यक्तींना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

याप्रसंगी प्रा. डॉ. के. आर. शिंपी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. सर डॉ. मो. स. गोसावी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.संस्थेच्या पीएच.डी. प्राप्त प्राध्यापकांना व गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. संस्थेच्या ‘स्वयंप्रकाश आणि ‘स्वयंप्रेरणा’ या संशोधनपर नियतकालिकांचे प्रकाशन नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी ना. गोपाळ कृष्ण गोखले स्मृती व्याख्यानमाला - २०२२ चे पुष्प गुंफताना राम नाईक यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, प्रसन्न हास्य, चांगल्या कामाचे कौतुक करणे हे उत्तम व्यक्तिमत्त्वासाठी आवश्यक आहे. यावेळी त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीतील महत्त्वाच्या आठवणी सांगितल्या. याप्रसंगी गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव यांना एम.सी.ई.ए.एम.तर्फे त्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल जीवनसाधना गौरव पुररकाराने सन्मानित केले. सूूत्रसंचालन डॉ. स्नेहा रत्नपारखी आणि डॉ. मुग्धा जोशी यांनी केले. प्राचार्या डॉ. कुलकर्णी यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...