आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ:लग्न समारंभातून माजी महापौरांच्या पत्नीच्या मंगळसूत्राची चोरी; संशयितावर गुन्हा दाखल

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना सुरुच आहे. अशातच एक प्रकार नाशिमधून उघडकीस आला आहे. एका लग्न सोहळ्याच्या ठिकाणी गाडीवर येत असतांना माजी महापौरांच्या पत्नीचे मंगळसुत्र खेचण्यात आले. संबंधित प्रकरणी खाडगाव पोलिस ठाण्यात संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेश वाघ रा. महाकवी कालाची कला मंदीर जवळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नविन खाडगाव नाका येथे लंडन पॅलेस कारने लग्न सोहळ्यास गेल्या होत्या. लग्न समारंभ आटोपून मुलगा पार्किंग ठिकाणी उभी असलेल्या कारमध्ये बसला. त्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने गळ्यातील सात तोळे वजनाचे मणी मंगळसुत्र अणि सोन्याची चैन बळजबरीने अजून तोडून खेचून नेली. वाघ यांनी आरडाओरड करत संशयितांच्या मागे पळाल्या. परंतू संशयित तरुण रस्त्याच्या दिशेने पसार झाला. वाघ यांना आरोडाओरडा करूनही त्यांना मदत मिळाली नाही. दोन्ही चोरट्यांनीदुचाकीवर बसून द्वारका चौकाच्या दिशेने पळ काढला. घडलेल्या प्रकार पोलिसांनी सांगितल्यानंतर. खाडगाव पोलिस, गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास केला. वरिष्ठ निरिक्षण इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

महिलांनी घ्या अशी काळजी

लग्न सोहळ्याच्या बाहेर पार्किंग परिसरात संशयित सोनसाखळी चोर महिलांवर पाळत ठेवून सोनसाखळी चोरी करत असल्याचे या घटनेतून निदर्शनास आले. लग्न सोहळ्यास जातांना महिलांनी विशेष काळजी घ्यावी, मंगळसुत्र सोन्याचे दागिने पदराने झाकून घ्यावे.

बातम्या आणखी आहेत...