आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात ‘व्हायरल ‘ताप’:एक महिन्यात साडेचार हजार रूग्ण; ऑगस्टमध्ये अतिसाराचे 936, विषमज्वराचे 28 नवे रुग्ण आढळले

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लांबलेल्या पावसाचा फटका शहराच्या आराेग्याला बसला असून ऑगस्ट महिन्यांतच सर्दी, खाेकला व तापीचे असंख्य रुग्ण आहेत. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये व्हायरल तापाच्या तब्बल 4424 रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, यापेक्षा अधिक रूग्ण बाह्य रूग्ण विभागात उपचार घेत घरीच बरे हाेण्याची कसरत करीत आहे, तर खासगी रूग्णालयांच्या खाटाही याच तापाशीसंबधित रुग्णांनी फुल्ल झाल्या आहेत. व्हायरल तापाखेरीज ऑगस्ट महिन्यात अतिसाराचे 936 तर विषमज्वराचे 28 नवे रुग्ण आढळले आहेत.

गेल्या तीन वर्षापासून नाशिकचे आराेग्य बिघडले आहे. पहिली दाेन वर्ष ही वैश्विक महामारी म्हणून घाेषित झालेल्या कोरोनाने 'ताप' दिला. यंदा पावसाळा सुरू होताच स्वाईन फ्लू, डेंग्यू, चिकुनगुनिया या आजारांनी डाेकेवर काढले. आतापर्यंत स्वाईन फ्लूचे 136 रुग्ण आढळले असून त्यापैकी 6 जणांचा बळी गेला आहे. अन्य जिल्ह्यातून शहरात उपचारासाठी आलेल्या स्वाईन फ्लू रूग्णांचा आकडा 78 वर गेला आहे. त्यापैकी 14 जणांचा बळी गेला आहे.

अशातच, डेंग्यूग्रस्तांची संख्याही 172 वर पोहोचली असून ऑगस्ट महिन्यातच 99 नवे बाधित आढळले आहेत. या सर्व आजारांनी नाशिककर त्रस्त असताना ‘व्हायरल तापीचे रुग्ण वाढत आहेत. गत महिन्यातच या आजाराचे 4424 नवे रुग्ण आढळले असून घसा दुखण्यापासून सुरूवात झाल्यानंतर सर्दी, खाेकला, ताप, अंगदुखी, पडसे अशा आजारांनी रूग्ण त्रस्त हाेत आहेत. हीच साथ सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही कायम असून 1 ते 6 या कालावधीतही व्हायरल तापाची 209 जणांना लागण झाली आहे.

हा तर पावसाळ्यातील ‘ताप’

''फार घाबरण्याचे कारण नाही. मात्र, पुरेशी दक्षता घेणे गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे पावसाळ्यात व्हायरल ताप येताे. मुख्यत: घसा खवखवणे, नाक वाहणे, ताप, खोकला, अंगदुखी, अशी लक्षणेही दिसून येतात.'' - डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, मनपा.

बातम्या आणखी आहेत...