आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक पोलिसांना यश:अंबड औद्योगिक वसाहतीतील व्यवस्थापक खूण प्रकरणी चौघांना अटक; आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश

नाशिक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड औद्योगिक वसाहतीत दोन दिवसांपूर्वी भरदिवसा आहेर इंजिनिअरींग कंपनीच्या प्रवेशद्वारावर कंपनीचे व्यवस्थापक नंदलाल आहेर यांच्यावर तलवारीने वार करुन त्यांची निर्घृण हत्या केल्या प्रकरणात फरार असलेल्या चौघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे.

या घटनेनंतर पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली व अंबड पोलिसांचे पथक आरोपींच्या शोधार्ध रवाना झाले होते. पोलिस निरीक्षक श्रीकांत निबांळकर, निरीक्षक नंदन बगाडे, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे व पोलिस उपनिरीक्षक संदिप पवार यांनी या घटनेतील पहिला अल्पवयीन जखमी आरोपी पहिल्याच दिवशी ताब्यात घेतला. या नंतर या घटनेतील दुसरा संशयित सिद्धार्थ उर्फ गोलू जगदीश गायकवाड (वय 21) रा. चाळीसगाव याला बुधवारी रात्री चाळीसगाव येथून ताब्यात घेतले. तर तिसरा संशयीत पियुष अशोक माळोदे (वय 19) रा. मारुती संकुल दत्तनगर व चौथा अल्पवयीन मुलगा याला पोलिसांनी दत्तनगर भागातून ताब्यात घेतले. या प्रकरणातील संशयीताला अटक करून गुरुवारी हजर करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...