आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगवान ऋषभदेवांचा महामस्तकाभिषेक:एकाच कुटुंबातील चार पिढ्या आल्या एकत्र, जयजयकार आणि उत्साहाला उधाण

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भगवान ऋषभदेवांचा गुरुवारी (ता. 16) गर्भकल्याणक दिन असल्याने डॉ. पन्नालाल पापडीवाल या परिवाराच्या एकाच कुटुंबातील चार पिढ्यांनी एकत्र येत जयजयकारात महामस्तकाभिषेक उत्साहात केला. संकल्प व प्रार्थनांचे पौरोहित्य विजय पंडित यांनी केले. रजत कलशाने पापडीवाल परिवाराचा सन्मान करण्यात आला.

गुरुवारी महामस्तकाभिषेक सोहळ्याचा दुसरा दिवस होता. ऋषभदेवपुरम येथून सहभागी भाविक मोठ्या संख्येने ऋषभगिरी येथे पहाटेपासून पोहोचले हाेते. पीठाधिश रवींद्रकीर्ती स्वामीजींनी अर्घ्य समर्पण केले.

गणिनीप्रमुख श्री ज्ञानमती माताजी व प्रज्ञाश्रमणी आर्यिका श्री चंदनामती माताजी यांचे स्मरण करून श्रीफल अर्पण करण्यात आले. यावेळी वयोवृद्ध मुनी सिध्दांतकीर्ती तसेच कार्याध्यक्ष अनिलकुमार जैन, अधिष्ठाता सी. आर. पाटील, कोषाध्यक्ष प्रमोद कासलीवाल, चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल तसेच चंद्रशेखर कासलीवाल आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. जीवनप्रकाश जैन यांनी केले. हस्तिनापूर येथून ऑनलाईन सहभागी झालेल्या परमपूज्य आर्यिका ज्ञानमती माताजींनी विश्वशांती प्रार्थना करून आशीर्वाद दिले. त्या म्हणाल्या, डॉ. पन्नालाल पापडीवाल यांनी 21 वर्षे अनमोल योगदान दिले. त्यांचे पुत्र संजय, विजय व सर्व परिवार भगवान ऋषभदेवांच्या चरणी समर्पित आहे. संपूर्ण परिवाराच्या 5 पिढ्या एकत्र नांदत आहेत. त्यांचा आदर्श समाजाने घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...