आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आग:पालघरमध्ये आगीत होरपळून चार जणांचा मृत्यू, जखमी दोघांवर नाशकात उपचार

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालघर जिल्ह्यातील ब्राह्मणगाव गावातील एका दुकानवजा घराला सोमवारी होळीच्या दिवशीच मध्यरात्रीनंतर अडीच वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील दोन लहान मुलांसह चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेतील तीन जखमींना उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, या घटनेत गंगूबाई बाळू मौळे (७८), द्वारका अनंता मौळे (४६), पल्लवी मौळे (१५) आणि कृष्णा मौळे (१०) यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दुकानमालकाची पत्नी, आई आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे, अशी माहिती मोखाडा पोलिसांनी दिली. दुकानमालक अनंता मौळे आणि इतर दोन मुले आगीमध्ये भाजल्याने गंभीर जखमी झाले आहेत. अनंता मौळे यांच्यावर मोखाडा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर गंभीर जखमी भावेश मौळे व अश्विनी मौळे या दोघांवर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीच्या मोठ्या ज्वाला आणि धूर दिसू लागल्यानंतर गावकरी मदतीला धावले.

रात्री आग लागल्यामुळे घरातील सर्वच सदस्य झोपेत होते. ही आग लागल्यानंतर घरातील काही सदस्यांना बाहेर पडण्यात यश आले तर चौघांचा होरपळून मृत्यू झाला. सुमारे तासभर भडकणारी आग नंतर विझवण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी विवेकानंद कदम यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...