आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:बोरसेनगरमध्ये कुटुंबातील चौघांना बेदम मारहाण

मालेवाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मागील भांडणाची कुरापत काढून बिपिन भरत थोरात (२९) रा. बोरसे नगर या व्यापाऱ्यासह त्याच्या कुटुंबातील इतर तिघांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी कल्पेश गजानन मैंद याच्या विरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बिपिन थोरात यांनी फिर्याद दिली आहे. मैंद याने मागील भांडणाची पुरात काढत बिपिन याच्या घरासमोर जाऊन त्याला बाहेर निघण्याची धमकी दिली.

त्यावेळी बिपीनचा भाऊ व त्याचा मित्र हेमंत बाहेर आले. मैंद याने स्वप्निलला बेदम मारहाण केली. बिपिनमध्ये पडला असता त्याच्यासह त्याची आई व वहिनी यांनाही मारहाण केली. परिसरातील मंडळींनी घटनेची माहिती पाेलिसांना कळविली.

बातम्या आणखी आहेत...