आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:पती-पत्नीसह दोघा मुलांचीगळा चिरून निर्घृण हत्या, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुका हादरला

मालेगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पती-पत्नीसह दोघा मुलांचीगळा चिरून निर्घृण हत्या

शेतातील घराच्या ओसरीत खाटांवर झोपलेल्या पती-पत्नी व दोघा लहान मुलांची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. नांदगाव तालुक्यातील वाखारी येथे जेऊर रस्त्यालगत ही घटना घडली. शुक्रवारी सकाळी समोर आलेल्या हत्याकांडात समाधान अण्णा चव्हाण (३५), भारती समाधान चव्हाण (३२) या दांपत्यासह त्यांचा ५ वर्षांचा मुलगा अनिरुद्ध ऊर्फ गणेश व ७ वर्षांची मुलगी आराध्या यांचा बळी गेला आहे. हत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.

समाधान हा मालवाहतूक पिकअप व प्रवासी रिक्षा चालवत होता. त्याचे आई-वडील काही दिवसांपासून मुलीकडे गेलेले होते. त्याने गुरुवारी सायंकाळी मधुकर सांगळे यांच्याकडे पिकअप उभी केली होती. सांगळेंनी कांदे भरल्यानंतर समाधानला कॉल केला. प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी घरी जाऊन बघितले असता समाधान, पत्नी व दोन्ही मुले खाटांवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. कुऱ्हाडीसारख्या धारदार शस्त्राने चौघांच्या मानेवर व डोक्यात वार करण्यात आले होते. समाधान, भारती व अनिरुद्ध यांच्यावर प्रत्येकी दोन घाव होते. आराध्याच्या मानेवर, डोक्यात व हातावर तीन घाव होते. श्वानपथकाने मारेकऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना वाखारी रस्त्यावर रक्ताने माखलेला लाकडी दांडा सापडला.

कुठल्याही वस्तूची चोरी नाही
घरातून कुठल्याही वस्तूची चोरी झाली नसल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्यामुळे चोरी अथवा दरोड्याच्या उद्देशाने हत्या झाल्याची शक्यता खूपच कमी आहे. घटनास्थळी झटापट झाल्याच्या खुणा नाहीत. मारेकऱ्यांनी नियोजन करून हे हत्याकांड घडवल्याचा संशय आहे.

हत्येचे गुपित कायम
कुणाशीही वैर नसताना चव्हाण कुटुंबाची क्रूरतेने झालेली हत्या अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. मृत भारती यांच्यावर अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. शवविच्छेदन अहवालानंतर यातील सत्य समोर येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...