आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

भीषण अपघात :अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्यामुळे ट्रॅक्टर पलटी, 4 जणांचा मृत्यू तर 5 गंभीर जखमी

नाशिकएका महिन्यापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील घटना

नाशिक जिल्ह्यातील देवळ्यापासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या भावडबारी घाटाच्या पायथ्याशी वळणावर अज्ञात वाहनाच्या हुलकावणीमूळे ट्रॅक्टरचालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटून ट्रॅक्टर पटली झाल्याने 4 जण ठार झाले तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील सर्वजण चांदवड तालुक्यातील शिंदे भह्यळे व पुरी येथील रहिवासी असून एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत.

याबाबत पोलिस सूत्रांनी व अपघातातील जखमींनी दिलेली माहिती अशी की, पुरी ता.चांदवड येथील मधुकर भवर यांनी भावडे ता.देवळा शिवारात आठ दिवसांपूर्वी  पाच एकर जमीन विकत घेतली होती. तिच्या मशागतीसाठी मधुकर भवर यांची पत्नी, मुलगा, दोन सुना, दोन नातू, नात व शिंदे भह्यळे येथील व्याही, व्याहीन हे आज (दि.6) रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास  देवळा तालुक्यातील भावडे येथे व्याही भाऊसाहेब पर्वत काळे यांच्या ट्रॅक्टरने येत असताना भावडबारी घाटाच्या पायथ्याशी अज्ञात वाहनाने ट्रॅक्टरला हूल दिल्याने ट्रॅक्टर चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटून ट्रॅक्टर पलटी झाले आणि त्यात ट्रॅक्टरचालक भाऊसाहेब पर्वत काळे ( वय 55 वर्षे रा. शिंदे बाह्यळे), सोनू विजय भवर ( वय 10 वर्षे) सुनीता विजय भवर ( वय 38 वर्षे दोन्ही राहणार पुरी ता.चांदवड) हे जागीच ठार झाले तर विजय मधुकर भवर ( वय 46 वर्षे) यांना मालेगाव येथे अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले असता त्यांचा तेथे मृत्यू झाला त्यामुळे सदर अपघातात पुरी येथील एकाच कुटुंबातील पती, पत्नी व मुलगा हे तीन ठार झाले आहेत. तर, मधुकर भवर यांचे शिंदे भह्यळे येथील व्याही भाऊसाहेब काळे ठार झाल्याने शिंदे भह्यळे व पुरी येथे शोककळा पसरली.

गंभीर जखमींमध्ये अशाबाई भाऊसाहेब काळे( वय 50 वर्षे,रा.शिंदे बाह्यळे) मनीषा विशाल भवर( 30 वर्षे), दिया विशाल भवर( 10 वर्षे) , साहिल विशाल भवर( 8 वर्षे), सुमन मधुकर भवर( 60 वर्षे) आदींचा समावेश असून त्यातील तिघांना अधिक उपचारासाठी मालेगाव येथे हलविण्यात आले आहे.

0