आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचित्र अपघात:नाशकात महामार्गावरील इंदिरानगर बोगद्यावरील पुलावर चार वाहने धडकली; वाहतूक खाेळंबली, 3 जखमी

नाशिक16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई आग्रा महामार्गावरील इंदिरानगर बोगद्या जवळच्या उड्डाण पुलावर चार वाहने धडकल्याने विचित्र अपघात झाला. हा विचित्र अपघात मंगळवारी (दि.14) पहाटेच्या सुमारास झाला असून तिघे जखमी झाले आहेत. या अपघातात चारही वाहनांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून धुळ्याकडे जाणाऱ्या मार्गावर इंदिरानगर बाेगद्याच्या वरतीच पुलावर ही घटना घडली. मध्यरात्री ट्रकचे टायर पंक्चर झाल्याने ट्रक उड्डाण पुलावर उभा होता. याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकच्या हे लक्षात न आल्याने त्याने ओव्हर टेक करणाऱ्या ट्रकला पुढे जाण्यासाठी जागा दिली, मात्र या ट्रकने मागून धडक दिली. त्यात बाजूने जाणाऱ्या दुसऱ्या एका वाहनाला सुद्धा धडक दिली.

ही सर्व वाहने एकमेंकात अडकून पडल्याने पुर्ण रस्ताच वाहतूकीला बंद पडला हाेता. अपघातामुळे मुंबईहून नाशिककडे व पुढे मालेगाव, धुळे मार्गाकडे जाणारी वाहनांना रस्ताच नसल्याने वाहतूक काेंडी निर्माण झाली. त्याचवेळी पुढे आलेल्या वाहनानां पुन्हा मागे पाठवून खालत्या समांतर रस्त्याने वाहने वळवावी लागली. मंगळवारी सकाळपर्यंतही अपघातग्रस्त वाहने हटविण्याचे काम युद‌्धपातळीवर सुरू हाेते. दुपारनंतर वाहतूक सुरळीत करण्यात पाेलिस व महामार्ग पथकाला यश आले. या अपघाताने सकाळपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या हाेत्या.

बातम्या आणखी आहेत...