आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील निळवंडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात शाळेतून परतणाऱ्या करण मच्छिंद्र गवारी (१०) या चौथीतील बालकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सोमवारी (२० जून) सायंकाळी करण शाळा सुटल्यावर इमानवाडी वस्तीवरील आपल्या घरी चार-पाच मित्रांसोबत वाघाड कॅनॉलजवळून जात होता. त्यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला करत ओढून त्याला झुडपात नेले.
इतर मित्रांनी मदतीसाठी आरडाओरड केली. आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांनी तातडीने धाव घेत करणला बिबट्याच्या तावडीतून सोडवले, मात्र तो गंभीर जखमी झाल्याने त्यास तातडीने दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.