आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुड डे, सध्या तुम्ही काय करत आहात? सध्या कोठे आहात? मी एका बैठकीत आहे मात्र या ठिकाणी मला फोन उचलता येत नाही. कृपया मला पैसे हवेत. सायंकाळपर्यंत परत देतो असा संदेश पाठवून पालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. चंद्रकांत पलकुंडवार यांच्या नावाने फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बुधवारी पालिका आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांचा डीपी असलेल्या एका मोबाइल क्रमांकावरून अधिकाऱ्यांना आर्थिक मदतीबाबत संदेश आला. त्याचवेळी आयुक्तांच्या दालनात बैठक सुरू असताना डॉ. आवेश पलोड यांनी हा संदेश दाखवला. अधिकाऱ्यांनी आपल्यालाही असा संदेश आल्याचे दाखवले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत आयुक्तांनी तत्काळ पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांना माहिती दिली. तसेच पुलकुंडवार यांनी आपल्या परिचितांना सावध केले.
‘तो’ मोबाइल क्रमांक मंचरमधील व्यक्तीचा
९८३४२४६२६३ या क्रमांकावरून ताे संदेश आला हाेता. ताे मंचर येथील व्यक्तीचा असल्याचे निष्पन्न झाले. मात्र सर्चमध्ये नाना गुंडा, राजेश कणसे अशी नावे आली. आयुक्तांनी माझा कार्यालयीन कामासाठी ९७०२१०००५६ हा फक्त एकच नंबर असल्याचे सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.