आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:वीज खंडितचा संदेश पाठवत फसवणुकीचा फंडा ; लिंक पाठवत क्रेडिट कार्डचे क्लोन बनवत 90 हजारांचा गंडा

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोबाइलवर वीज जोडणी कट करण्याचा मेसेज आला तर सावध व्हा. अशाचप्रकारे मुंबई येथील रहिवासी बस प्रवास करत असताना मोबाइलवर मेसेज पाठवत अनोळखी ॲप डाऊनलोड करण्यास सांगत क्रेडिट कार्डचे क्लोन तयार करत त्याद्वारे ९० हजारांचा गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईनाका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती आणि रविकांत काळे (रा. बाजार स्ट्रीट, फोर्ट, मुंबई) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २२ मे रोजी मुंबईहून त्र्यंबक येथे आलाे होताे. त्र्यंबकेश्वर येथून नाशिकरोड रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी बस प्रवास करत असताना द्वारका येथे मोबाइलवर मेसेज आला. तुमचे वीजबिल थकीत आहे. काही वेळात वीज जोडणी कट केली जाईल असा मेसेज आला. मेसेजच्या खाली संपर्क नंबर दिला होता. काळे यांनी त्या अनोळखी नंबरवर संपर्क साधला. समोरील व्यक्तीने त्याचे नाव दीपक शर्मा असे सांगितले. तुमचे वीजबिल थकीत असून तुम्ही बिल भरले नाही तर जोडणी कट केली जाईल असे सांगत तुम्ही आत्ता बिल भरले तर कारवाई थांबवली जाईल असे सांगत विश्वास संपादन केला. काही वेळात मोबाइलवर ‘टीम व्हीवर क्विक सपोर्ट ॲप’ची लिंक पाठवत ती लिंक डाऊनलोड करण्यास सांगितले. काळे यांनी सदरील ॲप डाऊनलोड केले. ॲप ॲक्टिव्हेट करण्यासाठी १० रुपये ऑनलाइन पेमेंट पाठवण्यास सांगितले. काळे यांनी डाऊनलोड केलेल्या ॲपवर एसबीआय क्रेडिट कार्डची माहिती दिली. तसेच बँक खात्याची माहिती आॅनलाइन भरली. संशयिताने खाते हॅक करत बँक खात्यातून क्रेडिट कार्डचा वापर करत ऑनलाइन ९० हजार ३३८ रुपयांची खरेदी केली, अशी तक्रार काळे यांनी पोलिसांत दिली. वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहोकले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...