आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Free Ammonium Bicarbonate For Immersion; Facilities For Ganesha Immersion At Home From Today In All Six Divisions From The Municipality| Marathi News

आवाहन:विसर्जनासाठी अमोनियम बायोकार्बोनेट मोफत ;घरी गणेश विसर्जनासाठी पालिकेकडून आजपासून सहाही विभागात सुविधा

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रदूषणमुक्त व घरगुती गणेशाेत्सवासाठी महापालिकेने पीओपी मूर्ती विघटनासाठी अमोनियम बायोकार्बोनेटची पावडर विभागीय कार्यालयामध्ये उपलब्ध करून दिली असून त्याचा वापर करून घरच्या घरी गणेश विसर्जन करण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आवाहन केले आहे.

अमोनियम बायोकार्बोनेट पावडर ही महानगरपालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयात “विनामूल्य” उपलब्ध असून विभागीय कार्यालयनिहाय मोबाइल नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. गणेश विसर्जन करताना निर्माल्य नदीमध्ये न टाकता निर्माल्य कलशाचा उपयोग करा व नदीचे प्रदूषण टाळा. तसेच थर्माकॉल व प्लॉस्टिकचा वापर टाळा, असे आवाहन नागरिकांना मनपातर्फे करण्यात येत आहे.

स्वच्छता निरीक्षकांशी नागरिकांनी साधावा संपर्क
नाशिक पूर्व विभाग : सुनील शिरसाठ - 9423179173
नाशिक पश्चिम विभाग : संजय गोसावी - 9423179176
पंचवटी विभाग : संजय दराडे - 9763257778
नविन नाशिक विभाग : संजय गांगुर्डे - 9423179171
सातपुर विभाग : माधुरी तांबे - 8983159056
नाशिकरोड विभाग : अशोक साळवे - 9423179172

बातम्या आणखी आहेत...