आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:15 ते 20 वयाच्या मुलांसाठी सावानात माेफत पुस्तके ; ‘ग्रंथांशी करूया मैत्री’ योजना

नाशिक6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी पिढी वाचनापासून दूर जात आहे, साहित्य वाचत नाही अशी एकीकडे ओरड हाेत असताना सार्वजनिक वाचनालयाने त्यावर तरुणांची आणि ग्रंथांची मैत्री हाेण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. त्यासाठी तरुणांना हवे ते पुस्तक माेफत देण्याची ग्रंथांशी करूया मैत्री ही याेजना सुरू करण्यात आली आहे.

नव्या पिढीतील नवा वाचक तयार करण्यासाठी सार्वजनिक वाचनालय नाशिक या संस्थेने ग्रंथांशी करूया मैत्री ही योजना हाती घेतली आहे. या अंतर्गत १५ ते २० वयोगटांतील तरुणांना मराठी, इंग्रजी भाषेतील हवी ती पुस्तके सावानातून विनामूल्य घरी घेऊन जाता येणार आहेत. त्यासाठी अत्यंत माफक अनामत घेतली जाणार आहे. पण मासिक वा वार्षिक वर्गणी मात्र घेतली जाणार नाही. वाचनवृद्धीसाठी असलेल्या या याेजनेत अधिकाधिक तरुणांनी सहभागी व्हावे असे आवाहन सावानेच कार्याध्यक्ष गिरीश नातू, प्रमुख सचिव डॉ. धर्माजी बोडके, सहसचिव अॅड. अभिजित बगदे, ग्रंथसचिव जयप्रकाश जातेगावकर, सह ग्रंथसचिव मंगेश मालपाठक व कार्यकारी मंडळाने केली आहे.

माेफत पुस्तकांसह इतर उपक्रमही राबविणार
{काय वाचाल, कसे वाचाल याबाबतीत मार्गदर्शन चांगल्या पुस्तकांची यादी पुरविणार.
{पुस्तकांसंदर्भात व्याख्याने, चर्चा, परिसंवादांचे आयाेजन
{मान्यवर मंडळींच्या घरी भेट देऊन त्यांचे मार्गदर्शन
{वर्षभरात उत्तम वाचन करणाऱ्या वाचकांना ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

लायब्ररी ऑन व्हील प्रकल्पावरही काम सुरू
वाचकांना घरपाेच पुस्तके मिळावी यासाठी सावानाचा लायब्ररी ऑन व्हील या प्रकल्पासंदर्भात त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आल्याचे समजते. लवकरच त्यांचा अहवाल आल्यानंतर या विषयावर निर्णय घेतला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...