आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातून सव्वाशे ते दीडशे भाविक हजला जाणार:महेबुब-ए-सुब्हानी ट्रस्टकडून हज यात्रेकरूंना मोफत प्रथमोपचार किट

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हज यात्रेकरूंना पीर मेहबूब सुबहानी साहब वक्फ ट्रस्ट संचलित धर्मार्थ रुग्णालय संचालक अलीम पीरजादा यांच्यातर्फे प्रथमोपचार किटचे वाटप करण्यात आले. यात्रेदरम्यान आरोग्याची काही समस्या निर्माण झाल्यास त्यांना वेळेत प्रथमोपचार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने त्यांच्याकडून दरवर्षी मोफत प्रथमोपचार किट पेटी भेट म्हणून देण्यात येते.

प्रत्येक मुस्लिम बांधवांची एकच इच्छा असते, आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करावी. त्यानिमित्ताने दरवर्षी देशभरातून सुमारे दीड ते पावणेदोन लाख मुस्लिम भाविक हज यात्रेस जात असतात. कोरोना प्रादुर्भावामुळे दोन वर्ष यात्रेस जाणे शक्य झाले नाही. या वर्षी परिस्थिती सामान्य असल्याने सौदी सरकारकडून यात्रेवरील बंदी उठवली असल्याने जगभरातून कोटीच्या संख्येने भाविक यात्रेस जाणार आहे. यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

शहरातून सुमारे सव्वाशे ते दीडशे भाविक यात्रेस जाणार आहे. 8 किंवा 9 जुलैला यात्रा होणार असून 17 जूनला भाविकांचे पहिले विमान उडणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. यात्रेदरम्यान यात्रेकरूंना आरोग्याची समस्या निर्माण झालीच तर त्यांना डॉक्टरपर्यंत पोचण्यापूर्वी प्रथमोपचाराची आवश्यकता म्हणून काही औषधांची आवश्यकता असते. सर्दी, खोकला, ताप येणे तसेच, कुठल्या प्रकारची जखम झाल्यास त्यावर प्रथमोपचार करण्यासाठी आवश्यक असणारे विविध औषध आणि जंतुनाशक क्रीम, खोकल्याचे औषधाने परिपूर्ण असलेली प्रथमोपचार किट तयार करून ती हज यात्रेकरूंना देण्याचे काम संचालक अलीम पीरजादा यांच्यातर्फे केले जाते.

केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून मोफत वाटप करत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची अविरत अशा प्रकारची सेवा सुरू आहे. यंदादेखील त्यांनी आयोजकांना प्रथमोपचार किट तयार करून देण्यात आले आहे. सोमवारी आयोजकांकडून हज यात्रेकरूंना प्रथमोपचार किटचे वाटप करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...