आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएचएएलने विमान कंपन्यांना नाशिककडे आकर्षित करण्यासाठी एराेनाॅटिकल तसेच नॉन-एरोनॉटिकल शुल्कात भरीव सवलत आणि ऑपरेशनच्या सुरुवातीच्या काळात मोफत नाइट पार्किंगची ऑफर दिली आहे. ओझर विमानतळावर नुकतेच काम पूर्ण झाल्याने विमानतळावरील अत्याधुनिक क्षमतांचा वापर तसेच खात्रीशीर प्रवासी संख्या याचा सर्व विमान कंपन्यांना फायदा होईल.
तसेच विमान कंपन्या या विमानतळाचा वापर नाइट लंॅडिंगसाठी आणि वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी देखील करू शकतात, असे एचएएलने स्पष्ट केले आहे. यामुळे नाशिकमधून आणखी काही प्रमुख शहरांना विमानसेवा मिळण्याच्या आशा बळावल्या आहेत.
नाशिक विमानतळाकडे मुंबई विमानतळाला नाइट लंॅडिंगचा पर्याय म्हणून सुरुवातीपासूनच पाहिले जात आहे. त्याच दृष्टीने एचएएलने उचललेले हे नवे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे. नाशिक विमानतळ वर्षातील सर्व दिवस सकाळी ८ रात्री १० वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहे. भविष्यात प्रवासी विमान सेवेच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी ऑपरेशनल क्षमता वाढविण्यासाठी नवीन समांतर धावपट्टी उभारण्याचे नियाेजन असून अतिरिक्त टॅक्सी वे लिंकसह विमान पार्किंगसाठीच्या सध्याच्या सुविधांचा विस्तार केला जाणार आहे.
विमानतळाची सुरक्षा वाढवण्यासाठी टर्मिनल बिल्डिंग, एटीसी, रनवे आणि पार्किंग यांसह एरोड्म परिसरात सर्व सीसीटीव्ही कॅमेरे अत्याधुनिक तंत्रज्ञान डिजिटल सिस्टिमसह बदलण्यात येणार असल्याचे एचएएल प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
काेणत्याही प्रकारची विमाने उतरू शकणार
नुकत्याच पूर्ण केलेल्या धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीमध्ये मायक्रो सरफेसिंगच्या नवीनतम कोल्ड इमल्शन तंत्रज्ञानाचा समावेश होता. हायड्रोप्लॅनिंग समस्या दूर करण्यासाठी आणि सुरक्षित उड्डाण ऑपरेशन सुनिश्चित करण्यासाठी धावपट्टीचा पृष्ठभाग पुनर्संचयित करण्यासाठी धावपट्टीची संपूर्ण लांबी, तिच्या क्षमतेचे पुनर्मूल्यांकन करण्यात आले. सध्याच्या धावपट्टीवर आता काेणत्याही प्रकारची विमाने उतरू शकतील इतकी तिची क्षमता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.