आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑफर:नाशिक विमानतळावर माेफत नाइट लँडिंगची विमान कंपन्यांना ऑफर

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एचएएलने विमान कंपन्यांना नाशिककडे आकर्षित करण्यासाठी एराेनाॅटिकल तसेच नॉन-एरोनॉटिकल शुल्कात भरीव सवलत आणि ऑपरेशनच्या सुरुवातीच्या काळात मोफत नाइट पार्किंगची ऑफर दिली आहे. ओझर विमानतळावर नुकतेच काम पूर्ण झाल्याने विमानतळावरील अत्याधुनिक क्षमतांचा वापर तसेच खात्रीशीर प्रवासी संख्या याचा सर्व विमान कंपन्यांना फायदा होईल. तसेच विमान कंपन्या या विमानतळाचा वापर नाइट लँडिंगसाठी आणि वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठीदेखील करू शकतात, असे एचएएलने स्पष्ट केले आहे. यामुळे नाशिकमधून आणखी काही प्रमुख शहरांना विमानसेवा मिळण्याच्या आशा वाढल्या. नाशिक विमानतळाकडे मुंबई विमानतळाला नाइट लँडिंगचा पर्याय म्हणून सुरुवातीपासूनच पाहिले जात आहे. एचएएल हे नवे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

दिवसभर विमानतळ कार्यरत राहणार कमी दृश्यमानतेतही लँडिंग शक्य विमानतळ विकास योजनांमध्ये कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत ऑपरेशनल साहाय्यासाठी अत्याधुनिक रनवे व्हिज्युअल रेंज मापन उपकरणांची स्थापना व डॉप्लर व्हीएचएफ ओम्नी रेंज आदी तंत्रज्ञानाचा समावेश आहे.

सर्व प्रकारची विमाने उतरू शकण्याची नशकात क्षमता नुकत्याच पूर्ण केलेल्या धावपट्टीच्या देखभाल-दुरुस्तीमध्ये मायक्रो सरफेसिंगच्या नवीनतम कोल्ड इमल्शन तंत्रज्ञानाचा समावेश होता. हायड्रोप्लॅनिंग समस्या दूर करण्यासाठी आणि सुरक्षित उड्डाण ऑपरेशन सुनिश्चित करण्यासाठी धावपट्टीचा पृष्ठभाग पुनर्संचयित करण्यासाठी धावपट्टीची संपूर्ण लांबी, तिच्या क्षमतेचे पुनर्मूल्यांकन करण्यात आले. सध्याच्या धावपट्टीवर आता काेणत्याही प्रकारची विमाने उतरू शकतील इतकी तिची क्षमता वाढवण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...