आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑफलाइन प्रवेश:मुक्तचे ऑफलाइन प्रवेश 30 पर्यंत, थेट मुख्यालयात येऊनच

नाशिक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने यंदा तब्बल पाच महिने सुरू असलेली आॅनलाइन प्रवेशाची प्रक्रिया १५ नोव्हेंबरला संपुष्टात आली. परंतु त्यानंतरही विद्यापीठाने आॅफलाइन प्रवेशाची प्रक्रिया सुरू ठेवली आहे. थेट मुख्यालयात येऊनच संबंधित विद्यार्थ्याला प्रवेश घेता येणार असल्याचे विद्यापीठाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

मुक्त विद्यापीठात यंदा पाच लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. त्यामुळे आॅनलाइन प्रवेशाची लिंकही विद्यापीठाने बंद केली आहे. मात्र, अद्यापही काही विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा अर्ज केला असला तरीही शुल्क अद्याप भरले नसल्याने शिल्लक असलेल्या विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी विद्यापीठाने ३० नोव्हेंबरपर्यंत शुल्क भरण्यास मुदतवाढ दिली आहे.

या मुदतीसोबतच आता विद्यापीठाकडून आॅफलाइन प्रवेश देण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. त्यानुसार थेट विद्यापीठात येऊन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतील, असे कुलसचिव डाॅ. प्रकाश देशमुख यांनी सांगितले. विद्यापीठात संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्यासाठी व्यवस्था केली आहे. शिवाय आॅनलाइन प्रवेश शुल्क भरण्याची मुदत वाढविल्याने ती लिंकही सुरू आहे. परिणामी आॅफलाइन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठीही अडचण येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...