आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोफत प्रशिक्षणाचे आयोजन:तंत्रनिकेतनमध्ये १४ विषयांचे मोफत प्रशिक्षण; नाशिककर मात्र उपेक्षित

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तांत्रिक प्रशिक्षण घेऊन तत्काळ रोजगार उपलब्ध व्हावा, तरुण स्वतःच्या पायावर उभे रहावेत, यासाठी केंद्र शासनाकडून सामूहिक विकास योजनेंतर्गत शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोफत प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. विविध १६ प्रकारच्या अभ्यासक्रमाचे मुलांना मोफत प्रशिक्षण देऊन रोजगाराभिमुख बनविण्यात येणार आहे. पण, नाशिकमध्ये हे प्रशिक्षण कुठेही दिले जाणार नसल्याने नाशिककर मात्र यापासून उपेक्षितच राहणार आहेत.

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालये असलेल्या ठिकाणी तांत्रिकचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. एकूण राज्यात हा अभ्यासक्रम ४३ ठिकाणी सुरू झाला आहे. राज्यातील इतर शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. नाशिकमध्ये मात्र हा अभ्यासक्रम सुरूच होणार नाही.राज्यात अभ्यासक्रम सुरू केला जात असताना नाशिककरांना मात्र त्यापासून उपेक्षित ठेवण्यात आल्याने काहीशी नाराजी व्यक्त होत आहे. या कोर्ससाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

यासाठी नववी व दहावी पास गरजू विद्यार्थ्यांनी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये आपली नावे नोंदविता येणार आहे. यामध्ये ग्रामीण भागातील मुला-मुलींना प्राधान्य देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण घेतल्यानंतर मुले स्वतःचा उद्योग किंवा त्यांना तत्काळ रोजगार मिळण्यास मदत होणार आहे.पण नाशिककर यापासून वंचित राहणार असून याची दखल घेऊन नाशिकमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...