आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Free Treatment For 100 Patients; Nashik Seva's Mobile Clinic, 6 Days A Week In The City, 1 Day In Tribal Areas Treating The Poor| Marathi News

आराेग्य संवर्धन:१०० रुग्णांवर राेज माेफत उपचार ; नाशिक सेवा चा फिरता दवाखाना, सप्ताहात ६ दिवस शहरात, १ दिवस आदिवासी भागात गरिबांवर उपचार

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या नागरिकांना याेग्य वैद्यकीय उपचार व औषधाेपचार मिळावे यासाठी नाशिक सेवा समितीच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. याचसाठी समितीच्या वतीने फिरता दवाखाना सुरू करण्यात आला असून या माध्यमातून राेज शहरातील विविध भागांतील १०० हून अधिक रुग्णांची माेफत तपासणी व औषधाेपचार केले जाणार आहेत.

शहरातील झाेपडपट्टी परिसर व आदिवासी भागातील नागरिकांना आराेग्यांच्या सुविधेसाठी नाशिक सेवा समितीच्या वतीने विविध उपक्रम राबवत त्यांना मदतीचा हात दिला जाताे. याच उपक्रमांतर्गत संस्थेच्या वतीने िफरता दवाखाना असलेल्या माेबाइल व्हॅनचे नुकतेच लाेकार्पण करण्यात आले. या व्हॅनचा शुभारंभ नीरा ताराचंद गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला. याच बराेबर कॅनडा काॅर्नर येथील धर्मार्थ दवाखान्याची प्रारंभ करण्यात आला. सेवाभावी वृत्तीतून या दवाखान्यातूनही नागरिकांनावर माेफत उपचार केले जाणार आहे.साेमवारी ते शनिवारी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत रुग्णांची तपासणी या दवाखान्यात तर साेमवार ते शनिवार सकाळी ८ ते ११ या वेळेत फिरता दवाखाना असलेली व्हॅन ही शहरातील स्लम परिसरातील नागरिकांची तपासणी करणार आहे. यासाठी समितीचे अध्यक्ष राजेश पारीख, उपाध्यक्ष ताराचंद गुप्ता, सचिव विमल सराफ, काेषाध्यक्ष संजय कारिवाला आदी प्रयत्न करत आहेत.

दर रविवारी आदिवासी भागात रुग्णसेवा
नाशिक सेवा समितीच्या वतीने दर रविवारी त्र्यंबकेश्वर व पेठ आदिवासी तालुक्यातील भागांत व्हॅनद्वारे आराेग्य सुविधा पुरवली जाणार आहे.आदिवासी बांधवांच्या आराेग्य संवर्धनासाठी समितीच्या वतीने हा पुढाकार घेण्यात आला आहे.

आराेग्य संवर्धनाचा प्रयत्न
फिरता दवाखाना या उपक्रमाच्या माध्यमातून गरीब रुग्णांच्या आराेग्य संवर्धनाचा संस्थेचा प्रयत्न आहे. आठवड्यातून सहा दिवस शहरात व एक दिवस आदिवासी पाड्यांवर रुग्णांवर माेफत उपचारांसह आैषधांचेही वाटप केले जाणार आहे.
राजेश पारीख, अध्यक्ष, नाशिक सेवा समिती

बातम्या आणखी आहेत...