आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:स्वातंत्र्याेत्सवाला अमेरिकेतही आऽऽवाज नाशिक ढाेलचाच; अभिनेता सोनू सूद आणि अभिनेत्री निम्रत कौर यांचेही ढाेल वादन

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा होत असतानाच अमेरिकास्थित भारतीयांनीदेखील देशप्रेमाच्या उत्साहात मागे न राहता माेठ्या उत्साहाने नाशिकच्या ढाेल-ताशाचे वादन करीत एकच जल्लाेष केला. विशेष म्हणजे, या साेहळ्यात झालेल्या मानवंदना व सांस्कृतिक कार्यक्रमाचे नेतृत्व नाशिकच्या तरुणांनी केले. नाशिकचे डाॅ. सुनील आंैधकर यांचे चिरंजीव इंजिनिअर प्रणव व ऋतुजा कांबळे यांसह ५० हून अधिक नाशिकच्या तरुणांनी ढाेल-ताशांवर वेगवेगळेे ताल सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.

स्वातंत्र्य दिनानिमित्त इंडियन लीग ऑफ अमेरिका आणि मराठी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रँड रिव्हर अॅव्हेन्यू, नोव्हाय, मिशिगन येथे रविवारी (दि. २१) मराठी मंडळ, डेट्रॉइटने आयाेजन केले हाेते. यात मराठीसह कानडी, तेलगू, गुजरात आदी प्रांतांतील स्थानिक संघटनांनी सहभाग नोंदवला. अभिनेता सोनू सूद आणि अभिनेत्री निम्रत कौर यांची उपस्थिती हाेती. याचवेळी मराठी मंडळाने सादर केलेल्या ढाेल-ताशांच्या वादनावर सोनू सूद व स्थानिक अमेरिकेतील लाेकप्रतिनिधींनी ताल धरला. इंडियन लीग ऑफ अमेरिकेचे प्रतिनिधी विनय पटेल, मनोज पाटील, विक्रांत पटवर्धन, प्रणव औंधकर, सतीश लिंगमपल्ले, ऋतुजा कांबळे, माहेश्वरी हलकुरी, पल्लवी किंगे, चंद्रशेखर इती, अनुप इती, सुरेखा पोकळे, डॉ. अभिषेक वाजपे यांच्या सामूहिक प्रयत्नांनी उत्सव साजरा झाला.

क्रांतिकारकांचे स्मरण
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महाेत्सवानिमित्त मायभूमीत सर्वत्र उत्साहाचे वातावरण व विविध उपक्रम राबविले जात असतानाच अमेरिकेतील मराठी मंडळातील माझ्यासह इतर नाशिकच्या मित्रांनी पुढाकार घेत ढाेल-ताशांचे वादन घेण्याचे ठरविले. अवघ्या चार-पाच दिवसांत कार्यक्रमांचे नियाेजन करून माेठ्या जल्लाेषात अमृत महाेत्सव साजरा केला. त्याचवेळी क्रांतिकारांकांच्या याेगदानाची माहिती देत त्यांचे स्मरण करण्यात आले.
प्रणव औंधकर, डेट्रोइट

बातम्या आणखी आहेत...