आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादर महिन्यात प्रदूषणमुक्तीसाठी जनजागृती, गाेदाघाटावर स्वच्छता माेहीम, आदिवासी पाड्यांवरील महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यशाळा व आराेग्य शिबिर असे अभिनव उपक्रम लिनेस अंतर्गत राबविले जाईल. महिलांचा सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी अभियान हाती घेतले जाणार असल्याचे नूतन अध्यक्ष क्रांती प्रमोद गोरे यांनी सांगितले. ऑ ल इंडिया लिनेस क्लब नाशिकरोड शाखेची बैठक झाली. यात क्रांती प्रमोद गोरे यांची अध्यक्षापदी निवड करण्यात आली.
यानिमित्त संस्थेचे शपथग्रहण नुकतेच झाले. क्रांती गोरे म्हणाल्या की, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या आदिवासी तालुक्यांतील महिला अद्यापही शिक्षणापासून वंचित आहे, तसेच त्यांच्या आरोग्याच्याही समस्या कायम असून त्यांना यापासून बाहेर काढण्यासाठी औषधोपचार, जनजागृती आणि मुलींना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे गोरे यांनी सांगितले. यावेळी अंजली विसपुते, संगिता गायकवाड, श्यामला दीक्षित, मेधा पिंपळे, मुग्धा नगरकर, संगीता संचेती, जयश्री खंडेलवाल, अरुणा पटेल, बिना कपोते, नीलिमा अवथनकर, अपर्णा जोशी, बिना बेहेरे, प्रतिभा कुंभकर्ण आदी लिनेस सभासद उपस्थित होत्या. नाशिक शहराची प्रमुख ओळख असलेल्या गोदावरी नदीची स्वच्छता मोहीम लिनेस क्लब हाती घेत आहेे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.