आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Freedom Program Through Long March In Nashik An Initiative Of Hindu Military Education Society, Tricolor Rally Was Taken Out By NCC Students

नाशिकमध्ये लाँगमार्चद्वारे स्वातंत्र्यांचा जागर:हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचा पुढाकार; एनसीसी विद्यार्थ्यांनी काढली तिरंगा रॅली

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सैनिकी शिक्षणात देशात अग्रेसर असलेल्या सेंट्रल हिंदु मिलीटरी एज्युकेशन सोसायटीतर्फे स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून सध्या विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत सोमवारी शहरातील प्रमुख पंचवीस ठिकाणी विद्यार्थींनी सामुदायिक गायन केले.

दुपारी एनसीसीच्या छात्रांनी तिरंग्यांसह लाँगमार्च काढला. सायंकाळी काढलेल्या बाईक रॅलीने अवघे रस्ते गजबजून गेले होते. सोबतच भारत माता की जय, वंदे मातरम्, जय हिंदच्या घोषणांनी चौक दुमदुमन गेला होता.

13 ते 15 ऑगस्ट दरम्यान भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. हा अमृतमहोत्सव भारताचा स्वातंत्र्यसंग्राम, नाविन्यपूर्ण कल्पना, नवे संकल्प, स्वातंत्र्योत्तर फलनिष्पत्ती, अंमलबजावणी यासारख्या मुद्यांचा विचार करून विविध शैक्षणिक उपक्रमांनी साजरा करण्याचे ठरवले. त्यानुसार भोसला कॅम्पस परिसरात कार्यक्रम घेतले जात आहे. संस्थेने पाच हजार झेंडे विकत घेतले होते. हर घर तिरंगा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राबविण्यात आला. अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थी, शिक्षकांच्या मनात देशभक्ती व राष्ट्रनिष्ठेची भावना जागृत करण्याचा संस्थेचा प्रयत्न होता.

स्फुलिंग चेतवण्याचा प्रयत्न

750 विद्यार्थींनी शहरातील प्रमुख 25 ठिकाणी 75 सामुदायिक देशभक्तीपर गीत सदार केले. त्यात भगुर येथील सावरकर स्मारकांबरोबरच इंदिरानगर जॉगींग ट्रक, चार्वाक चौक, उंटवाडी रोड, जिल्हा बालकल्याण भवन, शालीमार, सिटी सेंटर मॉल, आंबेडकर पुतळा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा यासारख्या ठिकाणांच्या समावेश होता. जननी जन्मभूमी स्वर्ग से महान, मातृभूमी गान से गुंजता रहे, अब जाग उठो कमर कसो या गीतांचा समावेश होता. देशभक्तीपर गीताने पुन्हा एकदा स्फुलिंग चेतवण्याचा प्रयत्न झाला.

500 छात्रांचा सहभाग

संस्थेच कार्यवाह हेमंत देशपांडे यांनी इंदिरानगर,चार्वाक चौक भागात या विद्यार्थ्यांच्या चमुला भेट देत प्रोत्साहन दिले. कॉलेजच्या एनसीसी तसेच निवासी वसतिगृहातील 500 छात्रांनी हातात तिरंगा घेत कॅम्पसमधून लाँग मार्च काढला. पाच अश्वांनीही यात सहभाग घेतला होता. महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते झेंडा दाखवून औपचारिक सुरवात करण्यात आली.

शिक्षकांनी वेधले लक्ष

सायंकाळी संस्थेच्या विविध युनिटमधील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मोटारसायकल रॅली काढण्यात आली. मोटारसायकलला तिरंगा लावत, हेल्मेटसह पांढरे कपडे, भगव्या टोप्या परिधान केलेल्या शिक्षकांनी सर्वांचे लक्ष वेधले. जेहान सर्कल, बारदान फाटा, एबीबी सर्कल, सीबल हॉटेल, गोल्फ क्लब, जिल्हा परिषद, शालीमार, द्वारका, मुंबई नाका, गडकरी चौक, कॅनडा कॉर्नर, कॉलेज रोड मार्गे शिशुविहार असा रॅलीचा मार्ग होता.

वंदे मातरम्, भारत माता की जय यासारख्या घोषणांनी परिसर दुमदुमन गेला होत. मुंजे इन्स्टीट्युटच्या संचालिका डॉ. प्रिती कुलकर्णी, निता पाटील, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. टी. शिवाबालन हे रॅलीचे समन्वयक होते.

बातम्या आणखी आहेत...