आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेप्रति सहकार्याची तयारी:32 वर्षांनी ‘एलव्हीएच’च्या मित्रांचा मेळा ; प्रा. मांडवडेंच्या उपस्थितीने रंगत

नाशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाच्या १९९०-९१ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळा त्र्यंबकरोडवरील एका हॉटेलमध्ये उत्साहात पार पडला. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य रमेश मांडवडे व शैला मांडवडे उपस्थित होत्या. मेळाव्याला प्राचार्यांनीच उपस्थिती लावल्याने विद्यार्थ्यांना विशेष आनंद झाला. सहपरिवार उपस्थित असतानाही विद्यार्थी महाविद्यालयीन आठवणीत रमले.

यावेळी बचतगट स्थापन करण्याचा ठराव करण्यात आला. प्रा. मांडवडे यांनी विद्यार्थ्यांना याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी ३२ वर्षांनंतरही विद्यार्थ्यांनी आपली मित्रता व स्नेह जपून ठेवला. ही मित्रता व स्नेह असाच कायम टिकवून ठेवा, असे प्रतिपादन केले. राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कविता कर्डक यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विलास डागा यांनी केले. सूत्रसंचालन रामेश्वर अबांदे यांनी केले. तुषार बिडवे यांनी आभार मानले. यावेळी आयोजित विविध खेळांमध्ये सर्वांनी सहभागी होऊन आनंद लुटला.

विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास विलास डागा, रामेश्वर अबांदे, विकास कांबळे, सय्यद अन्सार, लक्ष्मण महापुरे, रमेश वाघाटे, सुरेश जाधव, अशोक औटे, शंकर जाधव, किरण टकले, तुषार बिडवे, पोपट नवले, माजी विद्यार्थिनी कविता निकम-कर्डक, सुनंदा वाजे, कल्पना माने, हेमांगी गर्जे, भारती उल्हाळे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...