आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:विद्यार्थ्यांसाठी ध्येयनिश्चितीतून यश पदरात

नाशिकराेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात विविध प्रकारच्या सरकारी नोकरी उपलब्ध हाेत असून विद्यार्थ्यांनी केवळ वेगवेगळ्या नोकऱ्यांच्या मागे न धावता जे आवडते क्षेत्र आहे, त्यामध्ये आपले करिअर करण्यासाठी प्राधान्य द्यावे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासोबतच आपल्या नोकरीचे ध्येय देखील निश्चित करावे, असे मार्गदर्शन प्रा. हेमंत कांबळे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जेलरोड येथे रोजगार मेळावा आयाेजित करण्यात आला. यामध्ये सरकारी नोकरी भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. हेमंत कांबळे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात, यामध्ये गणित, सायन्स, बुद्धिमत्तेचे प्रश्न हे गुगली टाकणारे असतात, या प्रश्नांना न डगमगता, प्रथम ज्या प्रश्नांची उत्तरे येतात, ती सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे, त्यानंतर अवघड प्रश्नांकडे वळावे, असे सांगितले.

नाशिकरोड, जेलरोड, उपनगर या परिसरातील युवक युवतींनी प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतला होता. निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, योगेश निसाळ, बापूराव डांगे, प्रवीण बोराडे, अवधूत पगारे, संजय बोराडे, हर्षल पाळदे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...