आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगीत मैफल:जीवनगाणे मैफलीतून ग. दि. माडगुळकरांना श्रद्धांजली

इंदिरानगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देव देव्हाऱ्यात नाही, नाच रे मोरा, माझ्या प्रीतीच्या फुला, नवीन आज चंद्रमा अशा एकाहून एक सरस गीतांनी ‘जीवनगाणे’ संगीत मैफल रंगली. लोकप्रिय कवी व गीतकार ग. दि. माडगूळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी (दि.१७) गंगापूर रोडवरील कूर्तकोटी सभागृहात सायंकाळी ७ वाजता कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले.

निर्मिती संकल्पना कलांगण चॅरिटेबल ट्रस्टच्या चैत्राली अभ्यंकर यांची हाेती. खुमासदार शैलीतील निवेदन हेमंत बर्वे यांनी केले. साथसंगत रागेश्री धुमाळ, अनिल धुमाळ, आदित्य कुलकर्णी, प्रसाद थोरात केले. गायक अमित दाते, चैत्राली अभ्यंकर यांनी सादर केलेली सर्वच गाणी रसिकांना खिळवून ठेवणारी हाेती. घर माझे काैलारु....या अजरामर गीताने सुरुवात होऊन काल मी रघुनंदन पाहिले... अशा एकापेक्षा एक लोकप्रिय भाव,भक्ती गीतांना दर्दी रसिकांचा प्रतिसाद मिळाला.

माडगूळकरांच्या लेखणीतून उतरलेली गाणी काही कविता, किस्से आणि त्यांच्या आठवणी उलगडल्या. सांगता कानडा राजा पंढरीचा या गीताने झाली. विविध संकल्पना घेऊन रसिकांसमोर मनोरंजनाबरोबर सामाजिक कार्याचे भान जपत अनेक गरजू संस्थांना मिळालेल्या निधीतून मदत करण्याच्या हेतूने चैत्राली अभ्यंकर आणि त्यांचा ट्रस्ट कार्यरत आहेत. त्याच सामाजिक हेतूने याही कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...