आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाली पडल्याने गंभीर जखमी:पांडवलेणीवरून मुलीसह दाेघे काेसळले

इंदिरानगर, सिडकाे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पांडवलेणी पाहण्यासाठी आलेले मुंबईचे पर्यटक लेणी बघताना तीन वर्षांच्या मुलीसह पाय घसरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. नाशिक क्लाइंबर्स अॅण्ड रेस्क्यू टीमने त्या दोघांना सुखरूप वर काढून तत्काळ दवाखान्यात दाखल केल्यामुळे दाेघांचाही जीव वाचला. शनिवारी (दि. २०) दुपारी १२.३० वाजता पांडवलेणीच्या २० क्रमांकाच्या लेणीजवळ हा प्रकार घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुंबईच्या मरोळ येथील साबियो साँचेस (४०) हे आपल्या तीन वर्षांच्या मुलीसह पांडवलेणी बघण्यासाठी आले होते. ट्रेकिंगचा अनुभव नसताना ते डोंगरावर गेले. पावसामुळे डोंगराची जागा निसरडी झाल्याने ते पाय घसरून खाली पडले. मुलीचा हात त्यांच्या हातात असल्याने तिच्यासह ते खाली कोसळले. त्यांच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर मार लागला. घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू पथकाचे दयानंद कोळी, नीलेश पवार, चंद्रकांत कुंभार, ओम उगले, अक्षय गाडगीळ हे घटनास्थळी दाखल झाले. दुसरी टीम अभिजित वाकचौरे, ऋषिकेश वाकचौरे, अजय पाटील, वेदांत वाणी यांनी साहित्य घेऊन मदत सुरू केली. तीन तासांच्या परिश्रमाने जखमींना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...