आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवेक व्याख्यानमालेतर्फे शुक्रवारी आयाेजन‎:‘कसाेटी विवेकाची’ प्रदर्शनातून‎ डाॅ. दाभाेलकरांचा जीवनप्रवास‎

नाशिक‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्य वेचणारे ज्येष्ठ‎ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे‎ जीवनकार्य व विवेकवाद यावर प्रकाश‎ टाकणाऱ्या ‘कसोटी विवेकाची’ या चित्र,‎ शिल्पकला प्रदर्शनाचे आयोजन शुक्रवारी (दि.‎ ३) करण्यात आले आहे.‎ कुसुमाग्रज प्रतिष्ठान व डॉ. नरेंद्र दाभोलकर‎ विवेक व्याख्यानमाला यांच्या संयुक्त विद्यमाने‎ ‘कुसुमाग्रज स्मरण’ या उपक्रमांतर्गत कुसुमाग्रज‎ स्मारकातील छंदोमयी आर्ट गॅलरीत हे प्रदर्शन‎ भरवले जाणार आहे. सायंकाळी ५ वाजता ज्येष्ठ‎ पत्रकार सुरेश भटेवरा यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे‎ उद्घाटन होणार असून ते दि. ६ मार्चपर्यंत‎ सकाळी ११ ते ८ या वेळेत खुले असेल. फ्रेण्ड्स‎ ऑफ दाभोलकर व परिवर्तन संस्था निर्मित हे‎ प्रदर्शन मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या‎ विद्यार्थ्यांनी साकारले आहे. डॉ. दाभोलकर यांचे‎ जीवनकार्य कलेच्या माध्यमातून उलगडले आहे.‎ प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन आयाेजकांनी‎ केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...