आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्यापासून मनसेचे पत्रक वाटप:भोंगे बंदीबाबत राज ठाकरेंची भूमिका घराघरापर्यंत पोहोचवणार कार्यकर्ते, पालिका निवडणुकीचीही तयारी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मशिदीवरील भाेंगे बंदीसंदर्भातील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पत्र सोमवारपासून म्हणजेच उद्यापासून शहरातील घराेघरी वाटले जाणार आहे. या पत्रक वाटपाच्या निमित्ताने पालिका निवडणुकीसाठी इच्छुकांनी स्वत:च्या प्रचाराचा नारळही फोडण्याची तयारी केली आहे.

गेल्या महिन्यात मनसेने मशीदीवरील भाेंगे हटवण्याच्या मुद्यावरुन आक्रमक भुमिका घेतली हाेती. राज्यभरात आंदाेलनेही झाली हाेती. राज ठाकरे यांनी विविध सभांमधून या मुद्यावरून राज्य सरकारला घेरले हाेते. तसेच, भाेंगे प्रकरणाला धार्मिक वळण मिळत असल्याचे बघून हा विषय सामाजीक असल्याचेही दावे-प्रतिदावे सुरू झाले हाेते.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता या विषयाचा कायमचा तुकडा पाडू या असे म्हणत जनजागृतीसाठी एक पत्र मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेत काढले हाेते. हे पत्रक नाशिकमधील मनसे पदाधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी 44 प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत हे पत्रक पाेहचवण्याचे नियाेजन सुरू केले आहे.

पाेलिसांना चकवा देण्याची तयारी

भाेंगेविराेधी आंदाेलनात मनसेच्या चाळीसपेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांवर गंभीर कारवाई झाली हाेती. आता देखील ही बाब वादात ठरण्याची शक्यता असून शहरात जमावबंदीचे आदेश लागू झालेले आदेश बघता गर्दी न करता फार तर दाेन किंवा चार कार्यकर्त्यांच्या समुह तयार करून पत्रक वाटपाची रणनीती आखली जात आहे.

नागरिकांमध्ये जनजागृती करणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर समन्वयक सचिन भोसले म्हणाले की, भोंगे हा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे. सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे ही मनसेची भूमिका आहे. त्यामुळे सोमवारपासून प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन आणि पोलिसांचे नियम व कायद्याचे पालन करून भोंगे बंदीसंदर्भात जनजागृती करणारे पत्रक वाटले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...